‘रोहित मला माफ कर मला हिम्मत राहिली नाही…मी खचलो.’ लेकाला चिठ्ठी लिहत शेतकऱ्याने जीवन संपवले

छत्रपती संभाजीगनरमधील पिंपळखुटा गावातील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या शेतऱ्याचे नाव विठ्ठल दाभाडे आहे. चार महिन्यापूर्वी दाभाडे यांनी जमीन गहान ठेवून बँकेने कर्ज मंजुर केले मात्र चार महिने झाले तरी बँकेच्या मॅनेजरने खात्यात पैसेच टाकण्यास टाळाटाळ केली.
विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याचे कुटुंबीय आज रितसर पोलीस तक्रार करतील. हे प्रकरण कोणीही दाबू शकणार नाही. विठ्ठल दाभाडे ला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या दोषी बँक अधिकाऱ्यावर सरकारला कारवाई करावी लागेल. pic.twitter.com/fOi6jLzbVC
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 30, 2024
वेळेत बँकेकडून पैसे न मिळाल्यामुळे बँक मॅनेजरच्या त्रासाला कंटाळून विठ्ठल दाभाडे यांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्येपूर्वी विठ्ठल दाभाडे यांनी चिठ्ठी लिहून त्यांनी मुलगा, पत्नीची माफी मागितली आहे. युजर्सकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की,’आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची चिठ्ठी वाचली तर डोळ्यात पाणी येते..पण या निर्दयी राज्यकर्त्यांना पाझर फुटत नाही! देशात उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्जमाफ होते. आणि इकडे शेतकरी जमीन गहाण ठेवून कर्जासाठी भटकत आहे. स्वतःची जमीन गहाण ठेवूनही कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला बँकेचे कर्मचारी आणि एजंट पैसे मागतात. राज्यकर्त्यांना शरमेने मान खाली घालायला लावतील अशा घटना आज महाराष्ट्रात घडत आहे.
त्यांनी पुढे लिहिले आहे की,’रोहित मला माफ कर मला हिम्मत राहिली नाही…मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे! विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याच्या मनातील हे अंतिम शब्द त्याने चिठ्ठीच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाला आणि बायकोला चिठ्ठी लिहून माफी मागितली.बँक आणि सत्ताधारी दोघांवर शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल झाला पाहिजे’, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.





