जळगाव : पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील पौड गावात एका समाजकंटकाने नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना केली. याप्रकरणी 19 वर्षीय चांद नौशाद शेख आणि त्याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. Supriya sule | काय म्हणाल्या रोहिणी खडसे? देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की, ज्यांना साधे नागरिकशास्त्र कळत नाही, त्यांना आमदारकी देऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. आता आरोपीला पकडणार कोण? तर, पोलीस यंत्रणा; आरोपीला शिक्षा देणार कोण? न्यायव्यवस्था; महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था राखणार कोण? गृहमंत्री; आणि अशा घटना रोखण्यासाठी धोरण राबवणार कोण? तर सरकार! असे असतानाही चित्रा वाघ मात्र सुप्रिया सुळे यांच्या नावाने खडे फोडत असल्याची टीका त्यांनी केली आहे. Rohini Khadse | चित्रा वाघ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गूड बुकमध्ये राहायचे आहे. त्यामुळे कोणावरही टीका करीत आहेत. त्यांनी आपल्या गोळ्या वेळेवर घ्याव्यात, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी लगावला आहे. मुळशी तालुक्यात एका अल्पसंख्याक व्यक्तीने मंदिरात महिलेवर अतिप्रसंगा केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी समाजा माध्यमावर सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. यावर रोहिणी खडसे यांनी पलटवार केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय ? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पौड गावातील अन्नपूर्णा देवीच्या मंदिरात एका तरुणाने गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना अतिशय घृणास्पद आणि संतापजनक आहे. कोणतीही संवेदनशील व्यक्ती हे सहन करणे कदापि शक्य नाही. माझी शासनाला विनंती आहे की, कृपया या तरुणावर तातडीने कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Chitra Wagh | घृणास्पद प्रकारावर चार ओळींचे ट्वीट टाकून गप्प : चित्र वाघ एरवी प्रचंड संवेदनशील असल्याचा आव सुप्रिया सुळे आणतात. अगदी रशिया आणि युक्रेन युद्धावरही त्या तावातावाने मते मांडतात; पण आपल्याच मतदारसंघात म्हणजे मुळशी तालुक्यातील पौड गावात जो घृणास्पद आणि संतापजनक प्रकार घडला त्यावर चार ओळींचे ट्वीट टाकून त्या गप्प आहेत? त्या नीच आणि विकृत चाँद शेखचे त्यांनी नावही घेतले नाही? तुष्टीकरणाचे राजकारण सुचते आहे का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. Rohini Khadse |