#IPL2020 : माफीनंतरही उथप्पावर कारवाई?
Updated On:

दुबई : आयपीएल स्पर्धेत करोनाचा धोका होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या रॉबीन उथप्पा याने हरताळ फासला आहे. त्याने चेंडूला लाळ लावल्याचे कॅमेऱ्यातून स्पष्ट दिसल्याने त्याच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
त्याने या प्रकरणी माफी मागितली असली तरीही त्याने नियमभंग केल्याने त्याला सूट दिली जाणार नाही, असेच चित्र दिसत आहे.





