रॉबर्ट वढेरा यांना ईडीचे समन्स ; चौकशीसाठी निघाले चालत, म्हणाले,” माझ्यावर दबाव…”

Robert Vadra ED summons। जमीन व्यवहार प्रकरणात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वढेरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यांना आज ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी, ईडीने त्यांना ८ एप्रिल रोजी समन्स पाठवले होते, परंतु ते त्या दिवशी हजर झाले नाहीत.
हे प्रकरण हरियाणातील शिकोपूर येथील एका जमीन व्यवहाराच्या चौकशी आणि त्याच्याशी जोडलेल्या मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. ईडी रॉबर्ट वढेरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीतील पैशांच्या व्यवहारांची चौकशी करत आहे आणि या संदर्भात त्यांची चौकशी करू इच्छित आहे.
“ते नेहमीच अत्याचार करतात” Robert Vadra ED summons।
ईडी समन्सबाबत रॉबर्ट वढेरा यांनी, “हे लोक नेहमीच मला दाबण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा जेव्हा मी जनतेचा आवाज उठवतो तेव्हा हे लोक मला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मला काहीही लपवण्याची गरज नाही. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतो आणि पुढेही देत राहीन.” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, वढेरा ईडी कार्यालयात पायीच निघाले आहेत. जमीन व्यवहाराबद्दल रॉबर्ट वड्रा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, “ईडीने सखोल चौकशी केली पण काहीही सापडले नाही आणि भविष्यातही काहीही सापडणार नाही.”असा दावा केला आहे.
#WATCH | Delhi: Businessman Robert Vadra says, “… There is nothing in the case. For the last twenty years, I have been summoned 15 times and interrogated for more than 10 hours every time. I have submitted 23000 documents…” pic.twitter.com/zbecF3gJQA
— ANI (@ANI) April 15, 2025
जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण Robert Vadra ED summons।
ईडी (अंमलबजावणी संचालनालय) नुसार, रॉबर्ट वड्रा यांच्या कंपनीने फेब्रुवारी २००८ मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीकडून गुडगावच्या शिकोहपूर भागात ३.५ एकर जमीन ७.५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. काही काळानंतर, वड्रा यांच्या कंपनीने तीच जमीन डीएलएफ नावाच्या एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीला ५८ कोटी रुपयांना विकली. ईडीला संशय आहे की हा व्यवहार मनी लाँड्रिंग योजनेचा भाग असू शकतो, म्हणून, एजन्सी या जमीन व्यवहारातून झालेल्या मोठ्या नफ्यामागील पैशाची चौकशी करत आहे.





