‘मी राजकारणात…’ ; ईडीच्या चौकशीदरम्यान रॉबर्ट वढेरांचा मोठा निर्णय

Robert Vadra । हरियाणा जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वढेरा यांना आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याआधीही ईडीने मंगळवार आणि बुधवारी रॉबर्ट वढेरा यांची अनेक तास चौकशी केली होती. ईडीच्या चौकशीपूर्वी, जेव्हा रॉबर्ट वढेरा यांनी राजकारणात प्रवेश करण्याविषयी सांगितले.
राजकारणात प्रवेश करण्याबद्दल हे सांगितले Robert Vadra ।
राजकारणात येण्याबाबत रॉबर्ट वढेरा यांनी बोलताना, “भाजप या मुद्द्यावर फक्त राजकारण करत आहे. देशातील जनता सर्वकाही जाणते. मी ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे. मी असा माणूस आहे की मला जितके जास्त दडपले जाईल तितकेच मी बलवान होऊन बाहेर पडेन. मी जनतेचा आवाज उठवणे कधीही थांबवणार नाही. जेव्हापासून मी राजकारणात येईन असे म्हटले आहे, तेव्हापासून भाजपने माझ्याविरुद्ध खालच्या दर्जाचे राजकारण सुरू केले आहे. लोक मला राजकारणात येण्याची इच्छा करतात. मी नक्कीच राजकारणात येईन आणि काँग्रेसला बळकटी देईन. मी जनतेचे प्रश्न उपस्थित करणे थांबवणार नाही. एजन्सींचा गैरवापर केला जात आहे.”अशी मोठी घोषणा केली आहे.
ईडीच्या चौकशीवर दिलेले उत्तर Robert Vadra ।
ईडी समन्स आणि चौकशीबाबत रॉबर्ट वाढता यांनी, “तपासणी अजूनही सुरू आहे. हे तेच जुने प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मी २०१९ मध्ये दिली आहेत. याला कोणताही ठोस आधार नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. भाजपचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी स्वतः मला या प्रकरणात दोनदा क्लीन चिट दिली होती, मग आता मला का बोलावले जात आहे? नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले त्याच दिवशी हे सर्व भाजपचा राजकीय प्रचार आणि ईडीचा गैरवापर असल्याचे दिसते.” असा आरोप यावेळी त्यांनी केला.
या प्रकरणांमध्ये चौकशी
ज्या प्रकरणात ईडी रॉबर्ट वढेरा यांची चौकशी करत आहे ते २०१८ सालाशी संबंधित आहे. गुरुग्रामच्या तौरू भागातील रहिवासी सुरेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी खेरकी दौला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, रॉबर्ट वढेरा यांच्या कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने काही इतर लोकांशी संगनमत करून फसवणूक केली. या प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणात, आयपीसीच्या कलम ४२० (फसवणूक), १२० (कट), ४६७, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर त्यात कलम ४२३ देखील जोडण्यात आले.
तक्रारदाराने आरोप केला आहे की फेब्रुवारी २००८ मध्ये, वढेरा यांच्या कंपनीने ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून शिकोपूर, गुरुग्राम येथे ३.५ एकर जमीन ७.५ कोटी रुपयांना खरेदी केली. जेव्हा कंपनीला या जमिनीवर व्यावसायिक प्रकल्पाचा परवाना मिळाला तेव्हा त्यांनी तीच जमीन डीएलएफ कंपनीला ५८ कोटी रुपयांना विकली. या व्यवहारातील पैशांच्या व्यवहारांची आणि अनियमिततेची चौकशी ईडी करत आहे.





