पुणे जिल्हा | जल जीवनाच्या कामामुळे रस्त्यांची वाट

चिंबळी, (वार्ताहर) – कुरुळी येथील कुरुळी ते डोंगरेवस्ती रस्त्याची जल जीवनाच्या कामामुळे दुरवस्था झाली असल्यामुळेच ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
या दोन किमी अंतराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असून मु-हेवस्ती, डोंगरेवस्ती, बांदलवस्ती, मोई गावाकडे जाणार रस्ता असल्याने सुमारे 500 विद्यार्थी, ग्रामस्थांनी प्रवास करावा लागतो.
सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइटपट्ट्यामधून जल जीवनाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या आहेत.
रस्त्यावर ठीकठिकाणी संबधित ठेकेदाराने काम झाल्यानंतर साइटपट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्याने पावसाने खचल्या असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दोन वर्षां पूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार्या मोठी-मोठी गोदामे, वेअर हाऊस ग्रामस्थांनी स्वखर्चाने या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइटपट्ट्यावर मुरूम टाकून व्यवस्थित केल्या होत्या.





