Nagar | नगर, पाथर्डी, शेवगांव तालुक्यातील रस्ते टाकणार कात

नगर, (प्रतिनिधी) – नगर, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील तीन रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून १८ कोटी ६६ लाख २७ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे या गावातील रस्ते कात टाकणार असून दळणवळणासाठी मोठ्या फायदा होणारा असल्याचे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले.
नगर तालुका हद्दीतील मठपिंपरी ते डोबेलेवस्ती रस्ता ७ कोटी ७६ लाख ७८ हजार, पाथर्डी मांडवा मोहोज खुर्द कडगांव मिरी शंकरवाडी ते तालुका हद्द ५ कोटी ५५ लाख ४० हजार, शेवगांव राज्य मार्ग ५२ माळेगांव देवटाकळी मजलेशहर ते तालुका हद्द ४ कोटी १८ लाख ३० हजार असा निधी या तीन रस्त्यांसाठी मंजुर करण्यात आला आहे.
तीन तालुक्यांमधून रस्त्यांची मागणी करण्यात आल्यानंतर खा. नीलेश लंके यांनी २१ जुन २०२४ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देउन नगर तालुक्यात ९.१८ कि मी, पाथर्डी तालुक्यात ६ .९० कि मी, तसेच शेवगांव तालुक्यात ४ कि मी अंतराच्या रस्त्यांसाठी निधी मंजुरीबाबत दिले होते.
हा निधी मंजुर करण्यासाठी खा. नीलेश लंके यांनी दिल्ली येथे पाठपुरावा केल्यानंतर तीनही कामांसाठी निधी मंजुर झाला असून तसे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांनी खा. नीलेश लंके यांनी सांगिअतले.





