Nagar | साकळाई योजनेसाठी पुन्हा रास्तारोको!

नगर, (प्रतिनिधी) – साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा. योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे,
या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने रविवार (दि. २२) रोजी नगर-दौंड महामार्गावर खडकी येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या ३० वर्षांपासून नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३० ते ३५ गावातील नागरिकांनी साकळाई पाणी योजनेसाठी लढा सुरु केला आहे. लाभधारक क्षेत्रातील ३५ गावांमधील नागरिकांनी योजनेसाठी वारंवार आंदोलन, उपोषण, मोर्चे, रास्तारोको, निवेदने देऊन सरकारता आठवण करुन देण्याचे काम केले आहे. परंतु, अद्यापही साकळाई योजनेता प्रश्न मार्गी लागलेता नाही.
गत लोकसभा निवडणुकीच्यावेळी वाळकी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना साकळाई योजना मार्गी लागण्याचा शब्द दिला होता. आताही राज्यात महायुतीचे सरकार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यानी पाठपुरावा करुन साकळाईच्या सर्व्हेक्षणाचे आदेश काढले. तसेच सर्व्हेक्षणासाठी निधी टाकून कामही पूर्ण झाले आहे.
आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. यासाठी कृती समितीचा पाठपुरावा सुरु आहे. साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनीच आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांनी चिखली येथे रास्तारोको केला होता. आता पुन्हा दि.२२ सप्टेंबर रोजी नगर दौंड महामार्गावर खडकी येथे रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या रास्तारोको आदोलनामध्ये शेतक-यांनी हक्काच्या पाण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष बाबा झेंडे महाराज, समाजसेवक भापकर गुरुजी,
नारायण रोडे, संतोष लगड, सोमनाथ धाडगे, शिवाजीराव विधाटे, रामदास झेंडे, रोहिदास उदमले, अमोल लंके, सोन्याबापू वाणी, राजेंद्र झेंडे, पुरुषोत्तम लगड, प्रतापराव नलगे आदींनी केले आहे.
आज सिंचन भवनला शेतकरी माडणार ठाण
गेल्या अनेक दिवसांपासून साकळाई योजनेचा प्रश्न भीजत पडला आहे. परंतु योजनेचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही.
योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे साकळाई कृती समिती शुक्रवारी सिंचन भवन येथे ठाण मांडून याबाबतचे निवेदन देणार असल्याची माहिती कृती समितीच्यावतीने देण्यात आली.
साकळाई योजनेसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री
साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असून याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कृती समितीची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.


