Ektanagari : एकतानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; क्षेत्रीय कार्यालयाकडून दूर्लक्ष
Ektanagari : पावसाळयात पूरस्थिती उद्भवल्यास मदत कशी करणार? हा सवाल

पुणे : पावसाळयात खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पूरस्थिती उद्भवणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
काही सोसायट्या ड्रेनेज लाईनसाठी खोदण्यात आलेला रस्ता दुरूस्तीनंतर खराब झाल्याने तसेच महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून ड्रेनेज वाहिन्या बदलण्यात आल्यानंतर दुरूस्तीचे काम निकृष्ट पध्दतीने केल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
तर या भागातून बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने या परिसरातील नागरिकांना खड्डयांचा सामना करावा लागत आले. त्यामुळे पावसाळयात पूरस्थिती उद्भवल्यास या एकतानगरीकडे मदतीसाठी जाणारा रस्ता खराब असल्यास मदत कशी करणार असा सवाल नागरिक करत आहेत.
तर दुसरीकडे प्रशासनाकडे याबाबत नागरीक तसेच लोक प्रतिनिधींकडून तक्रार करण्यात आल्यानंतरही दुरूस्तीच्या कामाकडे क्षेत्रीय कार्यालयाकडून दूर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा:
World Chocolate Day 2026 : मधुमेह असला तरी चॉकलेट खाऊ शकता! पण ‘या’ 6 नियमांचे पालन करणे अत्यावश्यक





