Pimpari : रस्ता बंद, ड्रेनेजलाइन मोकळी; मोशीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मोशी : आदर्श नगर, मोरया कॉलनी नंबर १४ टावरजवळील लाइनखालील मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी व उघड्या ड्रेनेजलाइनमुळे पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील अद्याप कोणतीही दुरुस्ती किंवा उपाययोजना करण्यात आलेली नाही. ड्रेनेजलाइन उघडी असल्याने दुर्गंधी व घाणीमुळे आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
तसेच या भागात डासांचे प्रमाणही वाढले आहे. रात्रीच्या वेळी या भागात पथदिवे असूनही पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती व ड्रेनेज व्यवस्था नीट करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.





