Dilip Walse Patil : अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करू नये : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
Dilip Walse Patil : निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ ग्राम अभियान व पालखी ग्राम प्रदक्षिणा आयोजित कार्यक्रमप्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.

मंचर : जीवनातील दुःख कमी करण्याची ताकद आपल्या श्रद्धास्थानाच्या माध्यमातून करावी.अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करू नये. एखादा व्यक्ती कर्मकांड करू लागला की त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे कर्मकांडाकडे कोणी जाऊ नये.असे आवाहन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ ग्राम अभियान व पालखी ग्राम प्रदक्षिणा आयोजित कार्यक्रमप्रसंगी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, अनिल पाटील, स्वामी समर्थांचे ऊर्जा स्तोत्र सतीश मोटे, सरपंच रवींद्र वळसे पाटील, मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुरेश टाव्हरे, माजी उपसरपंच शांताराम गावडे, मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील, उदय हांडे, सुरेश आवारी, बाळासाहेब येवले, मनीषा रवींद्र वळसे पाटील, संगीता थोरात, सुनीता हिंगे, रेशमा हिंगे, हेमलता मेंगडे, वंदना गावडे, सपना हांडे, सुजाता हांडे, स्वाती टाव्हरे, आदिक जाधव, कुंदा तुळेकर यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, दैनंदिन जीवनात आम्ही विविध धार्मिक कार्यक्रमात जात असतो. निरगुडसर येथील महिला श्री दत्त महाराज, स्वामी समर्थांची नि:शुल्क सेवा करत असून आयुष्यात श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ यांचे विचार जोपासून कार्य करणे गरजेचे आहे.
समर्थांचे, गुरुमाऊलीं स्वामींचे आशीर्वाद आपल्याला पुढे घेऊन जातील.स्वामींची सेवा करण्यासाठी सभा मंडप, सभागृह हवे असेल तर बांधून देतो. श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर निरगुडसर येथे असावे.यासाठी वीस लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे दिले जातील.
असे वळसे पाटील यांनी जाहीर करताच महिला भगिनींनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद व्यक्त केला. श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेची गावातून पालखीत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रांगोळ्या काढण्यात आल्या तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमानंतर अन्नप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.सतीश माटे आणि संगीता थोरात यांची भाषणे झाली.संगीता थोरात यांनी प्रास्ताविक केले. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
माझ्या आयुष्यात श्री दत्त महाराज व माझे खूप जुने नाते असून माझ्या वडिलांचे नाव दत्तात्रय व आईचे नाव अनुसया होते. लहानपणी घराच्या देव्हाऱ्यात दत्तात्रयाचा छोटा फोटो होता. त्याची पूजा करायचे काम माझ्याकडेच असायचे.त्यातून आनंद मिळायचा.
-दिलीप वळसे पाटील,माजी गृहमंत्री.
हेही वाचा : Pune District : गॅस टंचाईवर देशी उपाय! गोबरगॅस प्रकल्पांची वाढ; इंधनासोबत खताचाही दुहेरी फायदा





