Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया समोर
Ritu Tawde : भाजपकडून महापौर पदाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर रितू तावडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Ritu Tawde : मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौर पदावरून मोठी रस्खीखेच भाजप आणि शिवसेना यांच्यात झाली. मोठ्या नाट्यमय घडामोडी यादरम्यानच्या काळात घडल्या.
या निवडणुकीत भाजपला एकूण ८९ जागा मिळाल्या तर शिवसेना शिंदे पक्षाला २९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपचा मोठा भाऊ ठरला. यानंतर आज मुंबईत भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर आणि उमहापौर पदांच्या नावाची घोषणा केली आहे.
त्यानुसार पालिकेत दोन टर्म नगरसेविका म्हणून काम करणाऱ्या रितू तावडे (Ritu Tawde )यांना भाजपकडून महापौर पदासाठी उतरवण्यात आले असून, शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांना संधी देण्यात आली आहे. त्यानुसार दोन्ही उमेदवारांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत.
महापौर पदासाठी भाजपकडून अनेक महिला नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, भाजपकडून रितू तावडे यांना संधी देण्यात आली आहे. भाजपने महापौर पदासाठी आक्रमक महिला नेत्याला मैदानात उतरवले आहे. रितू तावडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या रितू तावडे?
‘मोठा आनंद आहे. भारतीय जनता पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे. वरिष्ठ जो निर्णय देतात तो सर्व कार्यकर्त्यांना मान्य असतो. माझ्यासाठी आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे,’ अशी पहिली प्रतिक्रिया महापौर पदाच्या नगरसेविका रितू तावडे दिली.
रितू तावडे या दोन टर्म पालिकेवर निवडणूक आलेल्या आहेत. घाटकोपरमध्ये रितू तावडे यांची मोठी ताकद बघायला मिळते. मुंबई महापालिकेचा महापाैर हा मराठी चेहराच असावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. भाजपने मराठी चेहऱ्यालाच संधी दिली आहे. अडीच अडीच वर्षांकरिता ही पदे असणार आहेत.






