Chandukaka Saraf Jewels: चंदुकाका सराफ ज्वेल्सचे ‘रिती 2.0’ कलेक्शन; गुरुपुष्यामृत आणि वटपौर्णिमेनिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर
Chandukaka Saraf Jewels: 18 जून ते 22 जून 2026 या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30 टक्के सूट

Chandukaka Saraf Jewels: चंदुकाका सराफ ज्वेल्सचे ‘रिती 2.0’ कलेक्शन; गुरुपुष्यामृत आणि वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर
दागिन्यांच्या क्षेत्रात दोनशे वर्षांची समृद्ध परंपरा जपणारे चंदुकाका सराफ ज्वेल्स, येणारी वटपौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत च्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांसाठी खास आकर्षक ऑफर आणि कलेक्शन घेऊन आले आहेत.
महिलांच्या आवडीनिवडी आणि सध्याच्या सोन्याच्या किमती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या ह्या ‘रिती 2.0 कलेक्शन’ या लाईट वेट सोन्याचे नेकलेसचे कलेक्शन ग्राहकांना पाहायला मिळणार आहे.
‘रिती 2.0’ हे लाईट वेट वजनाच्या गोल्ड नेकलेस कलेक्शनचे दुसरे संस्करण असून, यामध्ये पारंपरिक लांब आणि लहान नेकलेसच्या विविध आकर्षक डिझाइन्सचा समावेश असणार आहे.
सण-समारंभ, विशेष प्रसंग तसेच दैनंदिन वापरासाठी योग्य असलेल्या या नेकलेसची खासियत म्हणजे प्रत्येक नेकलेसचे वजन 15 ग्रॅमपेक्षा कमी आहे. Chandukaka Saraf Jewels
ग्राहकांसाठी विशेष ऑफर
गुरुपुष्यामृत आणि येणाऱ्या वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्सने ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणि कलेक्शन जाहीर करण्यात आले आहेत. 18 जून ते 22 जून 2026 या कालावधीत सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर फ्लॅट 30 टक्के सूट देण्यात आली आहे.
ही ऑफर 22 जून 2026 पर्यंत महाराष्ट्र मधील सर्व चंदुकाका सराफ ज्वेल्स शाखांमध्ये लागू असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी खर्चात उत्कृष्ट सोन्याचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी चंदुकाका सराफ ज्वेल्स ह्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
या कलेक्शनमधील डिझाइन्स आकर्षक, बहुउपयोगी आणि आधुनिक महिलांच्या शैलीला अनुरूप आहेत. पारंपरिक सौंदर्य, आधुनिक डिझाइन आणि परवडणारी किंमत यांचा सुंदर मिलाफ ‘रिती 2.0’ मध्ये सर्व ग्राहकांना पाहायला मिळणार आहे.
वटपौर्णिमा आणि गुरुपुष्यामृतच्या शुभ मुहूर्तावर पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या ‘रिती 2.0’ कलेक्शनमधून आपल्या आवडीचा दागिना निवडण्याची संधी यानिमित्त मिळणार आहे. (Chandukaka Saraf Jewels)
हेही वाचा:
Child Growth: मुलांची उंची वाढवायची आहे? या ५ सवयी आणि घरगुती उपाय ठरू शकतात फायदेशीर





