रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’मधील लुक समोर; ‘या’ खास दिवशी सिनेमा होणार रिलीज

Riteish Deshmukh | अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात रितेश स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले.
रितेशने मागे तळपता सूर्य आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधला फोटो पोस्ट करत लिहिले, “क्षणभर थांबलेला सूर्य…मावळतीचा मावळ..पण क्षणभरासाठीच…उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी… १०० दिवसांची मेहनत, निष्ठा, समर्पण आणि अपार जिद्द यावर अखेर पडदा पडला. असंख्य आठवणी, असंख्य अनुभव, आणि मनात कायम राहणारे क्षण.
महापराक्रमी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन घेऊन लवकरच येत आहोत !!!” रितेशने ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग पार पडल्यावर कृतज्ञता व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्याने स्टारकास्टच्या यादीत विद्या बालनला सुद्धा टॅग केलं आहे. आता सिनेमात कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार याचा उलगडा टीझर प्रदर्शित झाल्यावर होईल. Riteish Deshmukh |
View this post on Instagram
रितेश देशमुखने हा सिनेमा स्वत: दिग्दर्शितही केला आहे. तर ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुखने सिनेमाची निर्मिती केली आहे. रितेशने पोस्टमध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री लिमये, फरदीन खान, जितेंद्र जोशी यांना टॅग केले आहे.
सिनेमाची ही तगडी स्टारकास्ट पाहता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. पुढील वर्षी १ मे २०२६ रोजी (महाराष्ट्र दिन) हा सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. Riteish Deshmukh |
हेही वाचा:
Homemade Toner: हिवाळ्यात घरीच तयार करा टोनर, फक्त १० रुपयांत! त्वचा राहील मऊ आणि ताजीतवानी





