Riteish Deshmukh : ‘माझे भाऊ निवडणूक जिंकतील…’; अभिनेता रितेश देशमुखने व्यक्त केला विश्वास

Riteish Deshmukh । Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात आज बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे.
दिग्गज नेतेमंडळींसह अनेक सेलिब्रिटींनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेता अक्षय कुमार, अली फझल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, फरहान अख्तर, झोया अख्तर आणि राजकुमार राव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचाही समावेश आहे. रितेशने आपल्या मूळगावी म्हणजेच लातूरमधील बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुखही त्याच्याबरोबर होती.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रितेश देशमुखने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस रितेशने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी रितेश देशमुख यांना माध्यमांशी प्रश्न विचारले असता ते म्हणाले,
#WATCH | Actor couple Riteish Deshmukh and Genelia D’Souza cast their votes at a polling station in Latur for #MaharashtraAssemblyElections pic.twitter.com/Zi4XzwKt2O
— ANI (@ANI) November 20, 2024
“माझ्या कॅलक्युलेशननुसार महाविकास आघाडीचं सरकार येणार, माझे दोन्ही भाऊ निवडणूक जिंकतील,” असा विश्वास रितेशने व्यक्त केला. नंतर रितेशने मतदान केल्यानंतर शाई लावलेलं बोट दाखवत आम्ही तर आमचा एकच अंदाज लावून आलो आहोत. असं देखील सांगितलं.
रितेश देशमुखचे दोन्ही भाऊ निवडणुकीच्या रिंगणात
अभिनेता रितेश देशमुखचे सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात असून दोघेही काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. रितेशने मागील काही दिवसांमध्ये भावांसाठी जाहीर सभांना हजेरी लावून आपल्या फिल्मी स्टाइल भाषणाने लातूरमधील मतदारांची मनं जिंकली होती.





