Riteish Deshmukh : “वडील मुख्यमंत्री असल्याने सिनेमात काम मिळतंय”; रितेशने सांगितल्या कटू आठवणी
Riteish Deshmukh : 'नेपोटीझमचे टॅग मी माझ्या कष्टाने मोडून काढले'

Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख सध्या ‘लॉकअप सीझन २’ या लोकप्रिय शोमध्ये तो फराह खानसोबत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसत आहे. नुकतेच त्याने या शोमध्ये त्याच्या सुरुवातीच्या काळातील अनुभवांबाबत भाष्य केले आहे.
रितेशनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं, त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यामुळे त्याला सिनेविश्वात काम मिळतंय, असे टोमणे रितेशला अनेकांकडून ऐकायला मिळाल्याचे त्याने सांगितले. (Riteish Deshmukh)
#lockupseason2 – Riteish Deshmukh’s speech in Lock Up Season 2 was one of the most inspiring moments of the show.
When he entered Bollywood, many dismissed him as just a “nepo kid” because he was the son of a former Maharashtra CM. People believed he got opportunities because of… pic.twitter.com/xfriu43E1I
— Ravi Chaudhary (@BURN4DESIRE1) July 6, 2026
रितेश म्हणाला, “मी जेव्हा माझा पहिला सिनेमा केला, त्यावेळी माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मी इंडस्ट्रीत नवीन असताना काहीजण पाठीमागे बोलायचे, याचे वडील मुख्यमंत्री आहेत म्हणून याला काम मिळतं आहे, त्यांच्यामुळेच याचे सिनेमे चालतात. पण यामुळे मी खचलो नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली.” (Riteish Deshmukh)
पुढे तो म्हणाला, “मी गेल्या २३ वर्षांत ६० सिनेमे केले आणि आज एक यशस्वी अभिनेता म्हणून तुमच्यासमोर उभा आहे. माझ्याबद्दल जे काही बोललं गेलं, जे काही ‘नेपोटीझम’चे टॅग मला दिले गेले, ते सगळे मी माझ्या कष्टाने मोडून काढले. या सगळ्याला वेळ द्यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहनत करावी लागते. मेहनत केल्यावर यश नक्कीच मिळतं”, असा विश्वास त्याने यावेळी स्पर्धकांना दिला. रितेशचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांंनी त्याचे कौतुक केले आहे. (Riteish Deshmukh)
दरम्यान, रितेशने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटांसह त्याने मराठी चित्रपटांमध्ये देखील उत्तम भूमिका साकारल्या. अभिनयासह त्याने दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली आहे. अलिकडेच त्याच्या ‘राजा शिवाजी‘ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरला.
हेही वाचा:





