ऋता दुर्गुळे घेतेय सुट्ट्यांचा आनंद; पतीसोबतचे शेअर केले फोटो

मुंबई – अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे प्रसिध्दीच्या झोतात आली. तरुण वर्गात ती फारच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर देखील तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ऋता नेहमीच सोशल मिडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या ती पतीसोबत मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
ऋताने पती प्रतीक शाहसोबतचे (Pratik Shah) मालदीवमधील निळशार समुद्र किनाऱ्यालगतचे काही फोटो इनस्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऋताने गुलाबी आणि निळ्या रंगाचा को-ऑर्ड सेट परिधान केला आहे. ‘Water Babies’ असे कॅप्शन ऋताने या फोटोंना दिले आहे. तर दुसऱ्या एक फोटोत ती समुद्र किनाऱ्यालगत उभी असल्याचे दिसते. सध्या तिचे हे फोटो चाहत्यांच्या देखील चांगलेच पसंतीस पडत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, हृता दुर्गुळेने 18 मे रोजी अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा प्रतिक याच्याशी विवाह केला होता. हृता दुर्गुळे लग्नानंतर ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिसली होती. याशिवाय ती रवी जाधव (Ravi Jadhav) दिग्दर्शित टाइमपास 3 चित्रपटात आणि ‘अनन्या’ सिनेमात देखील झळकली होती. या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. कारण दोन्ही चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाली होती.





