IPL 2025 : आयपीएलमध्ये 27 कोटी मिळणाऱ्या पंतला मिळणार नाही पूर्ण पैसे? जाणून घ्या, Tax कापून हातात किती येईल रक्कम…

Rishabh Pant IPL 2025 Salary : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, पंतला आयपीएलचे संपूर्ण 27 कोटी रुपये मिळणार नाहीत. त्याच्या पगारातील मोठा हिस्सा कर म्हणून कापला जाईल. चला तर मग जाणून घेऊया की, 27 कोटी रुपयांपैकी पंतांना टॅक्स कापल्यानंतर किती रक्कम मिळेल.
रिपोर्टनुसार, पंतला भारत सरकारला कर म्हणून 8.1 कोटी रुपये द्यावे लागतील, त्यानंतर त्याला 27 कोटी रुपयांपैकी केवळ 18.9 कोटी रुपये आयपीएलचे मानधन म्हणून मिळतील.
जखमी झाल्यावर रक्कम मिळणार का..?
आयपीएल 2025 पूर्वी कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास, संघ बदली म्हणून दुसऱ्या खेळाडूचा समावेश करू शकतो. त्याचवेळी, टीम इंडियाकडून खेळताना भारतीय खेळाडूला दुखापत झाल्यास, त्याला त्याचे पूर्ण वेतन मिळेल कारण बीसीसीआय भारतीय खेळाडूंचा विमा काढून ठेवतात.
Your friendly neighbour Spider-Pant’s watch begins in Lucknow 🫶🕸️ pic.twitter.com/qMtdfsldRg
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) November 26, 2024
ऋषभ पंत सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर…
सध्या पंत बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. आता मालिकेतील दुसरी कसोटी 06 डिसेंबरपासून ॲडलेडच्या ओव्हलवर खेळवली जाणार आहे.
ऋषभ पंतची आयपीएल कारकीर्द…
ऋषभ पंतने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 111 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 110 डावांमध्ये त्याने 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटने 3284 धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये उच्च धावसंख्या 128* धावा आहे. पंतने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो 2016 ते 2024 या कालावधीत दिल्ली कॅपिटल्स या एकाच संघाकडून खेळला. आता पंत पहिल्यांदाच 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या माध्यमातून दुसऱ्या संघासाठी आयपीएल खेळताना दिसणार आहे.





