Rishabh Pant : ऋषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) कसोटी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा आपल्या नावाचे वादळ निर्माण करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

Rishabh Pant : भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) कसोटी क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा आपल्या नावाचे वादळ निर्माण करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात (Rishabh Pant) अवघ्या ५३ चेंडूंत तुफानी अर्धशतक झळकावताना पंतने कसोटी क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करण्याचा मोठा टप्पा गाठला.
नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर बरोबर आठ वर्षांनी पंतने (Rishabh Pant) हा पराक्रम केला असून, त्याने जगातील दिग्गज क्रिकेटपटूंना मागे टाकत सर्वात जलद शतकी षटकारांचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी पंतने आपल्या आक्रमक फलंदाजीचा थरार दाखवून दिला. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या पंतने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर लॉन्ग-ऑफच्या दिशेने गगनचुंबी षटकार खेचला. हा फटका इतका प्रचंड होता की चेंडू थेट मैदानाबाहेर गेला आणि मैदानावरील पंचांना नवा चेंडू मागवावा लागला.
हा पंतचा कसोटी कारकिर्दीतील ९९वा षटकार ठरला. यानंतर कुमाराच्याच पुढील षटकात फाइन लेगच्या दिशेने अप्रतिम हुक शॉट खेळत पंतने चेंडू पुन्हा सीमारेषेबाहेर धाडला. या षटकारासह पंतने कसोटी क्रिकेटमधील आपला १००वा षटकार पूर्ण केला आणि अवघ्या ५३ चेंडूंमध्ये आपले धडाकेबाज अर्धशतकही साजरे केले.
या ऐतिहासिक खेळीसह सर्वात कमी डावांमध्ये आणि सर्वात कमी चेंडूंमध्ये कसोटीत १०० षटकार मारणारा ऋषभ पंत हा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या ८९ डावांमध्ये आणि ४,९१८ चेंडूंचा सामना करताना हा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १०० षटकार ठोकणारा पंत हा केवळ चौथा फलंदाज ठरला आहे.
याआधी ॲडम गिलख्रिस्ट, ब्रेंडन मॅक्युलम आणि बेन स्टोक्स यांनी हा टप्पा गाठला आहे. सर्वाधिक १३८ षटकारांचा विक्रम बेन स्टोक्सच्या नावावर असला, तरी सर्वात कमी डावांत आणि चेंडूंत हा टप्पा सर करण्याचा विक्रम आता ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नावावर जमा झाला आहे.
कसोटीत सर्वात कमी डावांमध्ये १०० षटकार लगावणारे फलंदाज
- ऋषभ पंत – ८९ डाव
- अॅडम गिलक्रिस्ट – १३० डाव
- बेन स्टोक्स – १५१ डाव
- ब्रेंडन मॅक्युलम – १७० डाव
कसोटीत सर्वात कमी चेंडूंचा सामना करत १०० षटकार लगावणारे फलंदाज
- ४,९१८ चेंडू – ऋषभ पंत (भारत)
- ६,५७८ चेंडू – अॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
- ९,०४२ चेंडू – बेन स्टोक्स (इंग्लंड)
- ९,७५६ चेंडू – ब्रेंडन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)






