Ram Nath Kovind | आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. यंदाच्या मेळाव्याला रामनाथ कोविंद विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी रेशीम बाग मैदानातून मुख्य अतिथी म्हणून संबोधित केले. विजयादशमी दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या १०० वर्षांची वाटचाल आणि समाजाच्या कार्याचं कौतुक केलं. तसंच आजच्या तरुणांना त्यांनी राजकारणात येण्याचेही आवाहन केले. तरुणांनी राजकारणात यायला हवं, लोकांच्या सेवेसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचं रामनाथ कोविंद यांनी म्हटलं. “तरुणांना विनंती करेन की लोकांच्या सेवेसाठी सहभाग घ्यावा. राजकारणापासून दूर राहण्याची चूक करून समाजातील चांगले लोक आपल्यापेक्षा कमी योग्यता असलेल्या व्यक्तीच्या सत्तेचा भार वाहणं स्वीकारतात. त्यामुळे तरुणांनी राजकारणात सक्रीय व्हावं, हे समाजाच्या हिताचं आहे. तुम्ही जे काय आहात ते समाज आणि देशामुळे आहे. देशाचं, समाजाचं हे ऋण फेडायला हवं. जे मागे राहिलेत त्यांना पुढे न्यायाला पाहिजे. तरुणांना योग्य दिशा देणं गरजेचं आहे, संघाबद्दल तरुणांचं आकर्षण वाढतंय ही चांगली गोष्ट आहे,” असे रामनाथ कोविंद म्हणाले. Ram Nath Kovind | ‘संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही’ संघाशी पहिल्यांदा संबंध आला, त्या क्षणांना कोविंद यांनी उजाळा दिला. 1991 साली ते कानपूरच्या घाटमपुर विधानसभा क्षेत्रातून उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढत होते. त्यावेळी ते भाजपचे उमेदवार होते. त्यावेळी निवडणूक प्रचारादरम्यान संघाचे अधिकारी आणि स्वयंसेवकांशी त्यांचा संबंध आला होता. संघाच्या लोकांनी कुठलाही जातीय भेदभाव न बाळगता प्रचार केला होता. संघात कधीही जातीय भेदभाव होत नाही, संघ सामाजिक एकतेचा पक्षधर आहे, असं कोविंद यांनी सांगितलं. Ram Nath Kovind | “माझ्या जीवनात या दोन महान व्यक्तींच विशेष योगदान राहिलं आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत, तर डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी देशाला समृद्ध संविधान दिलं. त्यामुळे मी एक सामान्य माणूस असूनही देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदापर्यंत पोहोचू शकलो. डॉ. आंबेडकरांच्या चिंता आणि विचार प्रक्रिया डॉ. हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्याच होत्या. डॉ. आंबेडकरांनी ज्या प्रमाणे समाजाच्या सर्व वर्गांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, संघाने सुद्धा एकात्मता स्त्रोत्राच्या माध्यमातून हाच संदेश दिला. संघाचा समावेशी दृष्टीकोन याचं प्रमाण आहे” असं रामनाथ कोविंद म्हणाले. Ram Nath Kovind | यावेळी रामनाथ कोविंद यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मरण केलं. दलित विरोधी आरोपांवर अटलीजींनी स्पष्ट केलं होतं की, ‘आम्ही मनुस्मृतीचे नाही, भीम स्मृतीचे अनुयायी आहोत’ असं रामनाथ कोविंद यांनी सांगितले. या विजयादशमी उत्सवात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देश-विदेशातील अनेक मान्यवरही उपस्थित होते. Ram Nath Kovind | हेही वाचा: “काठ्यांना तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही, शिवसैनिकांच्या हातामध्ये AK-47…”; राऊतांचा टोला