रिमी सेनने प्लास्टिक सर्जरीवरुन ट्रोल करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर; म्हणाली…

Rimi Sen | बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे. नुकतेच रिमीचे काही फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये तिची बदललेली स्टाइल दिसत होती. यात तिला ओळखणेही कठीण झाले आहे. यावरून रिमीने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चा झाल्या. यावरून तिला ट्रोलही करण्यात आले.
यावर आता रिमीने खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, “जर लोकांना वाटत असेल की मी प्लास्टिक सर्जरी केली आहे आणि जर ते चांगल्या पद्धतीने बोलत असतील तर माझ्यासाठी चांगले आहे. कारण प्लास्टिक सर्जरी केली नसतानाही लोक असं म्हणत आहेत. मी केवळ फीलर्स, बोटॉक्सस पीआरपी ट्रीटमेंट केली आहे. याशिवाय काहीच नाही.”
View this post on Instagram
“सध्या मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट घेते. ते मला चांगलं दिसण्यासाठी मदत करतात. कदाचित लोकांना माझ्या लेटेस्ट फोटोंमध्ये माझी त्वचा आवडली. या गोष्टी केल्यानंतर आणि नियंत्रणात ठेवल्यानंतर कोणीही चांगलं दिसू शकतं. जर तुम्ही माझ्यातील दिसणाऱ्या बदलाला चुकीचं बोलत असाल तर मी ही चूक कशी सुधारु मला सांगा. जेणेकरुन मला डॉक्टरांनाही याची कल्पना देता येईल.”
ती पुढे म्हणाली, “जोपर्यंत एखादा व्यक्ती काही गुन्हा करुन पळून जात नाही तोपर्यंत त्याला प्लास्टिक सर्जरीची गरज लागत नाही. भारताबाहेर खूप चांगले डॉक्टर्स आहेत जे फेसलिफ्ट उत्तम करू शकतात. मलाही हे करायचं आहे पण वयाच्या ५० व्या वर्षानंतर मी याचा विचार करेन.”
दरम्यान, रिमी सेनने ‘क्योंकी’, ‘हेरा फेरी’, ‘गोलमाल’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमुळे तिला लोकप्रियता मिळाली. पण मागील अनेक वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीपासून दूर गेल्याचे पहायला मिळाले.
हेही वाचा:
ज्यु. एनटीआर-जान्हवीचे ‘देवरा’मधील ‘धीरे धीरे’ रोमँटिक सॉंग वादात





