Rihanna Barbadian singer । हॉलिवूड सिंगर रिहाना जामनगरमध्ये झाली शिफ्ट ?

Rihanna Barbadian singer । मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री वेडिंग शूट सध्या चांगलेच चर्चेत आहे. या दोघांचेही जुलैमध्ये लग्न होणार आहे पण जामनगरमध्ये 1 ते 3 मार्च असे तीन दिवस प्री-वेडिंग सेलिब्रेशन चालणार आहे.
View this post on Instagram
या प्री वेडिंग शूटला बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील फेमस कलाकार सहभागी होत आहेत. सलमान खान आणि रणबीर कपूरच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ आले आहे. दरम्यान, सर्वाधिक चर्चेत असलेली गायिका म्हणजे रिहाना.
आता रिहानाच्या सामनाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. सोशलवर रिहानाच्या सामानाचा एक विडिओ समोर आला आहे ज्याने भारतातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मीडियावर सेलिब्रिटी फोटोग्राफरने व्हिडिओ शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, हे रिहानाच्या परफॉर्मन्सची सामग्री आहे, हे असे आहे जे आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नाही. या सामानात खूप मोठे बॉक्स दिसतात. हे खोके पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहे.
या व्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे, ‘रिहाना तुला जामनगरमध्ये कायमस्वरूपी राहायचे आहे का ? एकाने लिहिले आहे, बिग बॉस 14 चा स्पर्धक शार्दुल पंडितने लिहिले आहे, हा कोणता लेहेंगा आहे? तर एकाने लिहिले आहे,’रिहानाजामनगर कायमचे स्थलांतरित झाले आहे का?’ अशा संमिश्र प्रतिक्रिया सध्या रिहानाच्या सामनावर होत आहे
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी जामनगरमध्ये उपस्थित आहे. तिच्या आजोबांचे जन्मस्थान आणि वडिलांचे जन्मस्थान, गुजरातमधील जामनगर येथे लग्नाआधीचे सेलिब्रेशन होत आहे.
हेही वाचा
shreyas talpade । ‘गोलमाल 5’ चित्रपटाबाबत श्रेयस तळपदेने केला खुलासा





