Ozar News : श्रीक्षेत्र ओझर येथे पहिल्याच दिवशी दोन द्वार यात्रा उत्साहात; हजारो भाविकांचा सहभाग
Ozar News : भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त अष्टविनायकांपैकी प्रमुख स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथे श्री विघ्नहर गणपतीचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे.

Ozar News : भाद्रपद चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी प्रमुख स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतींचा जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. यंदा तिथीचा क्षय झाल्याने जन्मोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उंब्रज व धनेगाव अशा दोन द्वार यात्रा उत्साहात पार पडल्या. (Ozar News)
गणेश जयंती उत्सवानिमित्त श्री विघ्नहर गणपती बाप्पा पालखीतून आपल्या भगिनी तसेच विविध देव-देवतांना श्रींच्या जन्मोत्सवाचे आमंत्रण देण्यासाठी द्वार यात्रेला जातात. या द्वार यात्रेला प्राचीन धार्मिक परंपरा असून, श्रींच्या जन्मोत्सवातील या यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. (Ozar News)
उंब्रज येथील पहिले द्वार
पहिल्या दिवशी सकाळी उंब्रज येथील पहिले द्वार अत्यंत मंगलमय व भक्तिमय वातावरणात पार पडले. नदीपात्रातून श्रींची पालखी उंब्रज येथे दाखल होताच ग्रामस्थांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. श्रींच्या दर्शनासाठी मार्गावर तसेच उंब्रज परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. (Ozar News)
उंब्रज येथील महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीनारायण पूजा पार पडली. यावेळी उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. (Ozar News)
द्वार यात्रेत सहभागी भाविकांसाठी महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट उंब्रज, श्रीराम देवस्थान ट्रस्ट व सहकार सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ सहकारनगर, स्वामी समर्थ देवालय ट्रस्ट तसेच अनेक भाविक भक्तांच्या वतीने खिचडी, केळी, वेफर्स, शुद्ध पाणी व प्रसादाचे वाटप करण्यात आले. (Ozar News)
धनेगाव येथे दुसरे द्वार
यानंतर दुपारी ठीक १ वाजता धनेगाव येथील दुसरे द्वार सुरू झाले. धनेगाव येथे पालखीचे ग्रामस्थांनी भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी धनेगाव ग्रामस्थांच्या वतीने भाविक भक्तांना खिचडीचे वाटप करण्यात आले.तसेच धनेगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांचा सत्कार करण्यात आला. (Ozar News)
या दोन्ही द्वार यात्रांमध्ये अनेक भाविक श्रद्धेने अनवाणी चालत पालखीबरोबर सहभागी झाले. दिवसभर पालखीबरोबर मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. दहा हजारांहून अधिक भाविकांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. (Ozar News)
दुपारी १ वाजता सुरू झालेल्या धनेगाव द्वार यात्रेनंतर पालखीचा प्रवास भक्तिमय वातावरणात सुरू राहिला. विविध ठिकाणी भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले तसेच पालखीचे स्वागत केले. अखेर सायंकाळी ठीक ६ वाजता श्रींच्या पालखीचे श्री विघ्नहर मंदिरात आगमन झाले आणि भाविकांच्या जयघोषात पहिल्या दिवसाच्या द्वार यात्रेची सांगता झाली. (Ozar News)
या संपूर्ण सोहळ्यादरम्यान ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवत दोन्ही द्वार यात्रा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. (Ozar News)
जन्मोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उंब्रज व धनेगाव अशा दोन द्वार यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्या. हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग, ठिकठिकाणी झालेले स्वागत, प्रसाद वाटप आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने दुमदुमून गेला. (Ozar News)






