Satara: बाइक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचा संप, सातार्यात प्रवाशांची गैरसोय; संघटनांच्या विविध मागण्या
Satara रिक्षाचालकांचा संप सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू राहिल्याने चाकरमान्यांबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. रिक्षा बंद असल्याने, बसस्थानकाकडे अथवा घराकडे जाताना, नागरिकांना एसटी बसेस किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. शहर बससेवा बंद असल्याने नागरिकांची दैना झाली.

Satara: अॅप आधारित बाइक टॅक्सीला विरोध आणि इतर मागण्यांसाठी सातारा शहरातील रिक्षाचालकांनी सोमवारी संप केल्याने सोमवारी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शहरातील नेहमी गजबजलेल्या भागातील रस्त्यांवर वर्दळ कमी दिसत होती. त्याचबरोबर सर्व रिक्षा स्टॉप रिकामे होते.
रिक्षाचालकांनी बाइक टॅक्सीला विरोध दर्शवला असून ‘रॅपिडो’सारख्या अॅप आधारित बाइक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी बंद करावी. राज्य शासनाने ई-बाइक टॅक्सीला दिलेली परवानगी रद्द करावी, अशी रिक्षाचालकांच्या संघटनांची मुख्य मागणी आहे. त्याचप्रमाणे अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करावी. विनापरवाना प्रवासी वाहतूक करणार्या खाजगी वाहनांवर आणि अॅप आधारित प्रवासी सेवा देणार्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे. रिक्षाचालकांच्या आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रिक्षाचालकांचा संप सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू राहिल्याने चाकरमान्यांबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. रिक्षा बंद असल्याने, बसस्थानकाकडे अथवा घराकडे जाताना, नागरिकांना एसटी बसेस किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. शहर बससेवा बंद असल्याने नागरिकांची दैना झाली.




