रिचा चड्ढाने दाखवली लेकीची पहिली झलक; शेअर केली खास पोस्ट

Richa Chadha Ali Fazal Daughter | अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल आई-बाबा झाले आहे. रिचाने 16 जुलै रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर आता रिचा आणि अलीने लेकीची पहिली झलक शेअर केली आहे.
रिचा आणि अलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुलीच्या पायाचा फोटो शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या फोटोला दोघांनीही कॅप्शन दिले की, “आमच्या आयुष्यातील सर्वात मोठं Collab करत एक पोस्ट शेअर करत आहोत. आम्ही खूपच धन्य झालो आहोत. आमची गोंडस परी आम्हाला कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्यस्त ठेवत आहे. आमच्या लेकीला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मन:पुर्वक आभार मानतो.” रिचा आणि अलीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनी 2022 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यांनी लवकरच आई-बाबा होणार असल्याची बातमी दिली होती. अली फजलच्या कामाबद्दल बोलायचे तर, सध्या तो ‘मिर्झापूर ३’मुळे चर्चेत आहे. तर रिचा चड्ढा संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ सीरीजमुळे चर्चेत आली आहे. यातील तिच्या भूमिकेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले. Richa Chadha Ali Fazal Daughter |
हेही वाचा:




