Richa Chadha : चांगुलपणाचा गैरफायदा! करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात रिचाला जवळच्या व्यक्तीकडून धोका, म्हणाली “तेव्हापासून…”
Richa Chadha : करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात अभिनेत्री रिचा चढ्ढाला वाईट अनुभव आला होता. याबाबत एका मुलाखतीत तिने खुलासा केला आहे.
Richa Chadha : बॉलीवूडमधील प्रत्येक सेलिब्रिटींना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या आव्हानांचा सामाना करावा लागतो. या दरम्यान त्यांच्यासोबत काही वाईट घटनाही घडलेल्या असतात. प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चिढ्ढा हिच्यासोबत देखील अशीच एक घटना घडली होती. तिच्या अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिच्या जवळच्या व्यक्तीने तिचा विश्वासघात केला होता. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
जेव्हा एखादी व्यक्तीचा स्वभाव भोळा असतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या या स्वभावाचा गैरफायदा अनेकजण घेतात. अभिनेत्री रिचा चढ्ढा हिचा असाच स्वभाव होता, त्यामुळे एका व्यक्तीने तिचा विश्वासघात केला होता. ज्यानंतर तिचा चटकन कोणावरही विश्वास ठेवणे यावरचा पुरता विश्वास उडला. या घटनेतून अभिनेत्रीने धडा घेतला असल्याचे तिने सांगितले.
रिचाने अलीकडेच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात घडलेली घटना सांगितली. रिचा म्हणाली, “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, मी हा कठीण धडा शिकले की प्रत्येकाला तुमची काळजी असते असे नसते. मी भोळी होते. याच भोळेपणाचा फायदा एका व्यक्तीने घेतला. मात्र, त्या व्यक्तीचे नाव रिचाने सांगितले नाही. तिच्यासोबत नेमकी कोणती घटना घडली होती. याबाबत देखील तिने विस्ताराने सांगितले नाही.
View this post on Instagram
अभिनेत्री रिचा चढ्ढा तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारलेल्या आहेत. रिचाने नुकतीच मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. अनिल कपूर, मनोज बाजपेयी, शबाना आझमी आणि झोया अख्तर यासोबत इतर बॉलीवूड स्टार देखील उपस्थित होते. या भेटीनंतर रिचाने आनंद व्यक्त केला.
रिचाने मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले. तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिने लिहिले की, “खरोखरच खूप छान होते! मिस्टर प्रेसिडेंट, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिजिट मॅक्रॉन तुम्हाला भेटून आनंद झाला. स्वतंत्र सिनेमाच्या उज्ज्वल भविष्याला चालना देण्यात रस घेतल्याबद्दल धन्यवाद.”
हेही वाचा : Shahid Kapoor: शाहिद कपूरचा ‘ओ रोमियो’ चित्रपट घरबसल्या पाहता येणार; कधी आणि कुठे पहाल?





