सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिनचीट; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Rhea Chakraborty | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लिनचीट देण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती विरोधात कुठलाही पुरावा न सापडल्याने तिला क्लिनचीट देण्यात आली आहे. सीबीआयकडून कोर्टात सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे.
सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अभिनेत्याच्या घरच्यांनी आरोप लावले होते. अखेर कोणतेही पुरावे न मिळाल्याने रियाला क्लीन चीट देण्यात आली. त्यानंतर रियाने केलेली पोस्ट शेअर केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सबमिट केला. त्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. Rhea Chakraborty |
View this post on Instagram
यानंतर रियाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोच्या बॅकग्राऊंडला रियाने एक गाणं ठेवलं आहे. या इंग्रजी गाण्याचं नाव आहे सॅटिस्फाईड. म्हणजेच मी समाधानी आहे, अशा अर्थाने सुशांतची गर्लफ्रेंड रियाने पोस्ट केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
१४ जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ४ वर्ष ४ महिन्यांनी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या क्लोजर रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चीट मिळाल्याचे वृत्त समोर आले. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाने सुशांत सिंह राजपूतच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाने केला होता.





