Supriya Sule post : खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची मुलगी रेवती सुळे हिच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे रेवती सदानंद सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. उद्योपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचे लग्न होणार आहे. त्यामुळे पुण्याची लेक आता नागपूरची सून होणार आहे. आम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे, की आमची मुलगी रेवती सुळे ही वंदना आणि अरुण लखानी यांचा मुलगा सारंग याच्याशी लग्न करणार आहे, अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरून शेअर केली आहे. त्यामुळे रेवती आणि सारंग यांच्या लग्नावर शिक्कामोर्तेब झाला आहे. View this post on Instagram A post shared by Supriya Sule (@supriyasule.fc) सुप्रिया सुळे यांनी इंन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले आहे. त्यापैकी दोन फोटो हे रेवती आणि सारंग यांचे आहेत. तिसऱ्या फोटोत सासरे आणि जावईबापूंचं बाँडिंग पाहायला मिळत आहे. अरुण लखानींचे सुपुत्र सारंगसोबत रेवती यांचे अरेंज मॅरेज होत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि निर्मात्या स्मृती शिंदे यांनी इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाविषयी माहिती दिली होती. मात्र, यावर दोन्ही कुटुंबाकडून अधिकृत घोषणा करण्यात नव्हती. अखेर आज सुप्रिया सुळे यांनी या विवाहबाबत सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अधिकृत घोषणा केली आहे. रेवती सुळे यांच्याविषयी रेवती सुळे या सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्या आहेत. त्या राजकारणात सक्रिय नसल्या तरी २०२४ मध्ये त्यांनी आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारसभेत घरोघरी जात प्रचार केला. त्या २७ वर्षांच्या आहेत. रेवती सुळे यांनी मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्चशिक्षण घेतले आहे. कोण आहेत सारंग लखानी? सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखानी हे नागपूरातील विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा सारंग लखानी विश्वराज गृपमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणून काम केले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून बी.कॉममध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर Columbia Business School मधून MBA चे शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय सारंग हे एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. हेही वाचा : Drishyam 3 Film : अक्षय खन्ना दृश्यम ३ मधून बाहेर; ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याची होणार एन्ट्री