Retail inflation: महागाईत एप्रिलमध्ये किंचित वाढ; किरकोळ महागाई दर 3.48 टक्क्यांवर
Retail inflation: पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेले ऊर्जा दर तसेच संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे मान्सूनवर परिणाम होण्याचा धोका असल्याने महागाई वाढण्याची शक्यता कायम असल्याचेही रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.

Retail inflation: अन्नधान्यांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दरात किंचित वाढ नोंदविण्यात आली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये ३.४८ टक्क्यांवर पोहोचला. मार्च महिन्यात हा दर ३.४० टक्के होता.
एप्रिलमध्ये अन्न महागाई दर ४.२० टक्के नोंदविण्यात आला असून मार्चमध्ये तो ३.८७ टक्के होता. अन्नपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे एकूण महागाईवर दबाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – शेअर बाजारात हाहाकार; ‘या’ कारणामुळे सेन्सेक्स 1456 अंकांनी कोसळला
ग्रामीण भागातील महागाई दर ३.७४ टक्के, तर शहरी भागातील महागाई दर ३.१६ टक्के नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाईचा अंदाज ४.६ टक्के व्यक्त केला आहे. पहिल्या तिमाहीत महागाई दर ४ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आरबीआयने वर्तविली आहे.
पश्चिम आशियातील संघर्षामुळे वाढलेले ऊर्जा दर तसेच संभाव्य ‘एल निनो’ परिस्थितीमुळे मान्सूनवर परिणाम होण्याचा धोका असल्याने महागाई वाढण्याची शक्यता कायम असल्याचेही रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.





