Nagar | निवडणूक काळात खासगी वाहनांवर पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे चिन्ह लावण्यास निर्बंध

नगर, (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक कालावधीत खासगी वाहनावर सक्षम प्राधिकारणाच्या पूर्वपरवानगीशिवाय पक्षाचे चिन्ह लावण्यास निर्बंधाचे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यात सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगी शिवाय ऑटोरिक्षा, टेम्पो, मोटारसायकल व इतर खासगी वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादींवर या आदेशान्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.
आदेशाचा भंग करण्यार्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे कारवाई केली जाईल, तसेच हे आदेश 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय कार्यालय परिसरात निवडणूक प्रचारास बंदी
नगर, दि. 22 (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निवडणूक कालावधीत शासकीय कार्यालयांच्या परिसरात निवडणूक प्रचार करण्यास बंदी असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारामध्ये 25 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणार्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी सभा घेणे,
रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भात पोस्टर्स बॅनर्स पॅम्प्लेटस् कटआऊटस् किंवा जाहिरात फलक लावणे, निवडणूकविषयक घोषवाक्य लिहिणे, या आवारात निवडणूकविषयक घोषणा देणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे,
निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे, राजकीय कामासाठी सदर आवाराचा वापर करणे इत्यादी बाबींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणार्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 प्रमाणे कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.





