वाहन चालकांसाठी खुशखबर! हायवे आणि एक्स्प्रेस-वेवर 20 किमीपर्यंत टोल टॅक्स भरावा लागणार नाही

Toll Free Travel on Expressway: जर तुमच्याकडेही कार असेल आणि तुम्ही दररोज हायवे किंवा एक्सप्रेसवेवर प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता एका प्रणाली अंतर्गत तुम्हाला टोल भरावा लागणार नाही. टॅक्सी क्रमांक असलेल्या वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध नसून, खासगी वाहने असलेल्यांनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारने म्हटले आहे की जर एखादे वाहन ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) ने सुसज्ज असेल आणि ते कार्यरत असेल, तर ते वाहन महामार्गावर किंवा एक्सप्रेसवेवर दररोज 20 किमी चालविण्यासाठी टोल टॅक्स द्यावा लागणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा केली आहे.
20 किमी पर्यंत टोल टॅक्स नाही –
GNSS ही एक प्रकारची उपग्रह प्रणाली आहे जी वाहनाच्या स्थानाबद्दल माहिती देते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये बदलांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनाने दररोज 20 किमीपेक्षा जास्त अंतर कापले तर त्याच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल, असे या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. हा कर प्रत्यक्षात वाहनाने कापलेल्या अंतरानुसार असेल. महामार्ग किंवा एक्स्प्रेस वेवर एखादी कार दररोज 20 किमी चालवल्यास त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. मात्र वाहनाने 20 किमीपेक्षा जास्त प्रवास केल्यास टोल आकारला जाईल.
फास्टॅग असला तरीही हे तंत्र वापरता येते –
GNSS नावाच्या तंत्रज्ञानाद्वारे टोल टॅक्स वसूल केला जाईल. GNSS ही एक प्रकारची उपग्रह प्रणाली आहे, जी वाहनाच्या स्थानाशी संबंधित माहिती प्रदान करते. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जुलैमध्ये सांगितले होते की काही निवडक महामार्गांवर लवकरच नवीन प्रकारची टोल टॅक्स प्रणाली वापरण्याचा प्रयत्न केला जाईल. या तंत्रज्ञानाला GNSS असे नाव देण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान फास्टॅगसोबत काम करेल. म्हणजेच तुमच्याकडे फास्टॅग असला तरी तुम्ही हे नवीन तंत्रज्ञान वापरू शकता. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी एक नवीन पद्धत आणली आहे, ज्यामुळे टोलनाक्यांवर वाहने थांबवण्याची गरज कमी होईल.
दोन महामार्गांवर पायलट प्रोजेक्ट सुरू –
अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रीय परमिट असणाऱ्या वाहनांशिवाय कोणतेही अन्य वाहनाचा चालक, मालक, प्रभारी व्यक्ती राष्ट्रीय महामार्ग, कायमस्वरूपी पूल, बायपास किंवा बोगद्याच्या त्याच भागाचा वापर करणाऱ्याकडून GNSS-आधारित सुविधेनुसार एका दिवसात 20 किमी पर्यंतच्या प्रवासासाठी टोल आकारला जाणार नाही. कर्नाटकातील NH-275 च्या बेंगळुरू-म्हैसूर विभागावर आणि NH-709 च्या पानिपत-हिसार विभागात GNSS आधारित टोल संकलन प्रणालीवर एक पथदर्शी प्रकल्प (pilot project) सुरु करण्यात आला आहे.





