Pune News : आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद; डॉ. मोनिका काटे-पानसरे यांचा उपक्रम
Updated On:

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. शहरात हजारो वारकरी दाखल झाले असून, त्यांच्या सेवा-सुविधांसाठी पुणेकरांनी आपली परंपरागत तत्परता दाखवली आहे.
वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत डॉ. मोनिका ओंकार काटे-पानसरे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर शिवाजीनगर येथील नावाडी पुणे मनपा शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात पार पडले.
या शिबिरात १५०० हून अधिक वारकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांना विविध आरोग्य तपासण्या, सल्ला व आवश्यक औषधे देण्यात आली. या सेवाभावी उपक्रमास मोहन पानसरे व राष्ट्रीय कबड्डीपटू चंद्रकांत काटे यांचे विशेष सहकार्य लाभले.




