मूर्तीदान आवाहनास प्रतिसाद

पिंपरी – गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संस्कार प्रतिष्ठान आणि महापालिकेडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमातंर्गत गुरुवार रात्रीपर्यंत एकूण 6812 मूर्तींचे दान मिळाले होते.
संस्कार प्रतिष्ठान आणि महापालिका यांच्या वतीने गणपतीदान व संकलनासाठी सहा वाहनांची व्यवस्था करण्यात आली. थेरगाव घाट येथे चार वाहनांची व्यवस्था करण्यात आली. थेरगाव पूल घाटावर 1755 भाविकांनी मूर्तींचे दान दिले व 2 टन निर्माल्य गोळा करण्यात आले. बिजलीनगर 175, रस्टन कॉलनीतील 60, काकडेपार्क 180, मोरया गोसावी परिसर 134, श्रीधरनगर 25, स्पाईन सिटी 765, थेरगाव, 315, वाकड परिसर 800, पिंपळे गुरव 133, पिंपळे निलख 163, प्राधिकरण 655, मोशी 33, जाधववाडी चिखली 321, निगडी 43, वैभवनगर घाट पिंपरी 732, वाल्हेकरवाडी जाधवघाट 410, रावेत घाट 80, असे एकूण 6812 मूर्तींचे दान मिळाले.
विनोदे वस्ती, वाकड येथील तळ्यात रात्री 1 वाजेपर्यंत विधीवत विसर्जन केले. बाहेरुन आलेल्या सुमारे चार हजार मूर्तींचेही विसर्जन झाले.




