पिंपरी | घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली शहरात सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या स्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष कांचन जाधव व सहकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या सहकार्याने साडी देऊन सन्मान करण्यात आला व या महिला कामगारांना हेल्थ कार्ड ही वाटप करण्यात आले आहे. तर डॉ.महेंद्र जैन यांच्या रुग्णालयात या हेल्थ कार्ड मुळे 25 टक्के सूट मिळणार असल्याने या उपक्रमामुळे गरीब महिला कामगारांना दिलासा मिळाला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार महेंद्र थोरवे, खालापूरच्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका शिवानी जंगम, स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव, उपाध्यक्षा शीतल ढोकले, शिंदे गट शिवसेना विधानसभा अध्यक्ष पंकज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल,
शिवसेना शहर प्रमुख संदीप पाटील, ताराराणी ब्रिगेटच्या राष्ट्रीय अध्यक्ष वंदना मोरे, शिवसेना खोपोली शहर संघटिका प्रिया जाधव, खालापूरच्या नगरसेविका सुप्रिया साळुंखे, दिनेश थोरवे,अनिल मिंडे, सचिन महाडीक, राजेंद्र मांडे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या पुढे घरकाम करणाऱ्या महिलासाठी शासनाकडून नवीन योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार थोरवे यांनी सांगितले. यावेळी आमदार थोरवे यांनी कांचन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन जगदीश मराजगे यांनी केले.





