Pimpri : वाढदिनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प
Updated On:

देहूगाव : देहू नगरपंचायतीने कार्यालयीन अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांच्या वाढदिवसाला केक न कापता प्रत्येक वर्षी पाच वृक्षांची लागवड करून त्या झाडांची जतन करण्याचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नगरंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक प्रियांका कदम यांच्या वाढदिवसानिमित्त येथील गायरानातील ऑक्सिजन पार्क येथे वड, पिंपळ, आंबा अशी ५ झाडे लावण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, योगेश परंडवाल, सचिन साळुंके, विकास कंद, शिवाजी महाराज मोरे, शहर अभियंता संघपाल गायकवाड, नगररचनाकार सुरेन्द्र आंधळे, कर निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, लेखापाल केशव पिनाटे, शहर समन्वयक अक्षय रोकडे, असिफ शेख, पवन मोरे, दत्ता शिंदे उपस्थित होते.





