पिंपरी | स्वच्छतेच्या दृष्टीने खोपोली शहर आदर्श करण्याचा संकल्प

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली शहर स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा संकल्प आमदार महेंद्र थोरवे यांनी शहरातील घनकचरा वाहतूक व प्रक्रियेच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.
यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी शासनाच्या माध्यमातून आणला असल्याचे स्पष्ट करुन भविष्यकाळात या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपये आणण्याचे उद्दिष्ट थोरवे यांनी याप्रसंगी जाहीर केले.
फक्त खोपोली शहर नव्हे तर संपूर्ण कर्जत खालापूर मतदार संघातील सर्व शहरे स्वच्छतेच्या दृष्टीने आदर्श करण्याचा मनोदय थोरवे यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, ठेकेदार व्हीडीके सर्व्हिसे प्रा. लि. यांनी स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांची एकही तक्रार येणार नाही, यासाठी पुरेपूर दक्षता घ्यावी असे आदेश दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष मोहन औसरमल, राजू गायकवाड, शिवसेनेचे संपर्कप्रमुख पंकज पाटील,
शहर प्रमुख संदीप पाटील, शिव उद्योग व सहकार सेनेचे शहर प्रमुख हरीश काळे, तात्या रिठे, भाजपाचे हेमंत नांदे, रॉबीन सॅम्युअल, सिद्धांत शेलार, प्रिया जाधव, जिनी सॅम्युअल, माधवी रिठे, प्रसाद वाडकर, संतोष मालकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





