Mahatma Phule and Savitribai Phule | समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्या, यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला होता. अखेर सोमवारी (२४ मार्च) केंद्र सरकारने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करावे अशी शिफारस करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत हा ठराव मांडला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्याचे समर्थन करताना आपले विचार मांडले. महात्मा ही उपाधी मोठी आहे की भारतरत्न पुरस्कार? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ यांच्या या विधानानंतर महात्मा की भारतरत्न यावरून चर्चा सुरू झाली आहे. महात्मा ही उपाधी जनतेनं दिली असून भारतरत्न अनेक आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. देशात महात्मा ही पदवी सर्वस्वी होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “फुले यांना देण्यात आलेली ‘महात्मा’ ही पदवी लोकांनी ओळखली आहे आणि आता राज्य ‘भारतरत्न’ ही पदवी देईल. देशात महात्मा ही पदवी सर्वस्वी होती. महात्मा फुले आणि महात्मा गांधी या दोनच व्यक्तींना हा सन्मान मिळाला.” काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारच्या ठरावाचं स्वागत केलं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची जुनी मागणी आहे. ती आता पूर्ण होत असल्यास सभागृहाची एकमतानं मंजुरी असेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लोकभावनेचा आदर करणारा आणि भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव तर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि भारतरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे , अशा शब्दात अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या. Mahatma Phule and Savitribai Phule | हेही वाचा : शिंदेंच्या माजी नगरसेवकाला महिला पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात चोपलं; नेमकं प्रकरण काय?