Shirpur Merchants Co-operative Bank: RBIची मोठी कारवाई! शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द; 6 एप्रिलपासून सेवा बंद
Shirpur Merchants Co-operative Bank: डीआयसीजीसीने संबंधित ठेवीदारांच्या संमतीनुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत एकूण विमा संरक्षित ठेवींपैकी 48.95 कोटी रुपयांचे वितरण आधीच केले आहे.

Shirpur Merchants Co-operative Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेकडे आपला व्यवसाय चालवण्यासाठी पुरेसे भांडवल आणि नफा नसल्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे.
सोमवारी एका निवेदनात आरबीआयने म्हटले आहे की, परवाना रद्द केल्यामुळे शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक 6 एप्रिल 2026 पासून बँक सेवा देणे बंद करेल. सहकारी आयुक्त, सहकारी संस्थांचे निबंधक यांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि लिक्विडेटरची (कंपनीची मालमत्ता विकून कर्ज फेडणार्याची) नियुक्ती करण्याची विनंती करण्यात आली आहे.
हेही वाचा – Uday Kotak: जागतिक संघर्षातून वसाहतवादाच्या पुनरागमनाची शक्यता; उदय कोटक यांचा इशारा
बँकेची मालमत्ता विकून कर्ज फेडल्यानंतर, बँकेतील प्रत्येक ग्राहक ठेवीदाराला त्यांच्या ठेवींवर ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून 5,00,000 रुपयांपर्यंतचे ठेव विमा संरक्षण मिळण्याचा हक्क असेल. सहकारी बँकेच्या आकडेवारीनुसार, सुमारे 99.7 टक्के ठेवीदार ठेव विमा आणि पत हमी महामंडळाकडून त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
डीआयसीजीसीने संबंधित ठेवीदारांच्या संमतीनुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत एकूण विमा संरक्षित ठेवींपैकी 48.95 कोटी रुपयांचे वितरण आधीच केले आहे. परवाना रद्द झाल्यामुळे, शिरपूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला ठेवी स्वीकारणे आणि वितरित करणे यासह बँकिंग व्यवसाय करण्यास तात्काळ प्रभावाने मनाई करण्यात आली आहे.





