महाबळेश्वर : महाबळेश्वर तहसिलदार सचिन मस्के यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. महाबळेश्वर तालुक्यामध्ये एकुण ७९ ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत आज सकाळी अकरा वाजता नियंत्रण अधिकारी अभिषेक देशमुख, उपजिल्हाधिकारी सातारा यांचे उपस्थिती मध्ये खादी ग्रामउद्योग मंडळ मध संचलनालय सभागृह महाबळेश्वर येथे पार पडली. महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज सकाळी 11 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तहसीलदार सचिन मस्के यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आणि उपजिल्हाधिकारी सातारा, अभिषेक देशमुख यांच्या उपस्थितीत, खादी ग्रामउद्योग मंडळाच्या संचालनालय सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. तालुक्यातील एकूण 79 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ७९ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांची पदे अनु. जाती एकूण ०६ (३ महिला, ३ खुला) अनु. जमाती साठी एकुण ०५ (३ महिला, २खुला), ना.मा.प्र साठी एकूण २१ (११ महिला, १० खुला). सर्वसाधारण साठी एकुण ४७ (२४ महिला, २३ खुला इतकी पदे मंजूर करण्यात आली आहेत. तहसिलदार सचिन मस्के यांनी महाबळेश्वर तालुक्यातील एकुण ७९ ग्रामपंचायतीमध्ये सोडतीद्वारे खालील प्रमाणे सरपंच पदे निश्चित करून जाहीर केले. अनुसुचित जाती : १) अनु. जाती महिला – शिंदी, गोडवली, वानवली तर्फ सोळशी (एकूण-०३) २)अनु. जाती – वलवण, रेणोशी, गुरेघर (एकूण-०३) अनुसुचित जमाती : १). अनु. जमाती महिला – येर्णे बु, माचुतर, भोसे (एकूण-०३) २)अनु जमाती – आमशी व गोरोशी (एकूण ०२) नागरिकांचा मागास प्रवर्ग : १)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – पिपरी तर्फ तांब, मेटगुताड, अहिर, आकल्पे, एरंडल, रुळे, बिरवाडी, तळदेव, आरव, जावली, रामेघर (एकूण ११) २). नागरिकांचा मागास प्रवर्ग – दांडेघर, झांजवड, कुमठे, कुंभरोशी, पाली तर्फ आटेगाव, कुरोशी, वेंगळे, दानवली, वेळापुर, चतुरबेट, (एकूण १०) सर्वसाधारण : १) सर्वसाधारण महिला – भेकवली, कासवंड, नाकिंदा, आचली, शिरवली, वाळणे, कळमगाव, दाभेदाभेकर, सौंदरी, मांघर, खरोशी, पांगारी, दाभेदाभेमोहन, खिगर, क्षेत्र महाबळेश्वर, मोळेश्वर, घावरी, पारुट, दुधगाव, आंब्रळ, भिलार, कोट्रोशी, वारसोळीदेव, तायघाट (एकूण २४ ) २)सर्वसाधारण – मेटतळे, हरचंदी, सोनाट, देवळी, गावढोशी, अवकाळी, मोरणी, उचाट, गोगवे, देवसरे, निवळी, भिमनगर, खांबील चोरगे, हातलोट, सालोशी, चिखली, लाखवड, पर्वत तर्फ वाघवले, बिरमणी, लामज, राजपुरी, पारपार, उंबरी (एकूण २३) दरम्यान, सरपंच पदाचे आरक्षण सोडतीची प्रस्तावना निवासी नायब तहसिलदार दिपक सोनावले यांनी केली. सर्व सरपंच आरक्षणाचे कामकाज महसूल नायब तहसिलदार विनोद सावंत, निवडणूक नायब तहसिलदार जहिदा शेख, तसेच सहा. महसूल अधिकारी हेमंत सुळ, सहा. महसूल अधिकारी दिपक चव्हाण, महसूल सहाय्यक केशव नांदेडकर व इतर सर्व महसूल कर्मचारी यांनी कामकाज पाहीले.