नेवासाफाटा – वेळोवेळी मागणी करूनही नेवासा नगरपंचायतमार्फत होत असलेल्या रस्त्याचे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागकरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत असुन त्यामुळे शहरात पायी चालणे अवघड झालेले आहे. या संदर्भात क्रांतिकारी पक्षाच्या नगरसेवकांनी ग्रामस्थांना बरोबर घेऊन मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन दिले.
नेवासा शहरातील ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणार रस्ता, नाईकवाडी गल्ली अँड. वाखुरे चौक- हेडगेवार चौक मारुती चौक या चालु असलेल्या रस्त्याचे काम पुर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत आहे. नेवासा शहर व उपनगरात डासांचे प्रमाण खुप वाढले असुन तसेच रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे पुर्ण शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. वेळोवेळी डास फवारणी करण्याची मागणी करुनही ती पुर्ण होत नाही, ती फवारणी लवकरात लवकर करण्यात करण्यात यावी. अन्यथा मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यात येईल व नगर पंचायत कार्यालय नेवासा यांना टाळेबंद करुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, महेश मापारी, अभिजीत मापारी, अंबादास इरले, संदीप बेळे, सचिन वडागळे, मोहम्मद टेलर, बबन पटेल, अहमद शेख, निवृत्ती लोखंडे, साहेबराव पानसरे, विशाल सुरडे, भाऊसाहेब वाघ, प्रभाकर गडाख, अन्सार शेख, दिलीप जामदार, दीपक दिघे, जायगुडे विशाल लष्करे, दत्तु चक्रनारायण उपस्थित होते.