पुणे जिल्हा | अल्पवयीन विद्यार्थिनीवर लग्नाच्या आमिषाने वारंवार अत्याचार करून गर्भपात

लोणी काळभोर, (वार्ताहर)- सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने वारंवार अत्याचार करुन तिचा गर्भपात केला. याप्रकरणी एका तरुणावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 24 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार धनकवडी (पुणे) व लोणी काळभोर येथील एका लॉजमध्ये घडला आहे.
दोन वर्षापूर्वी पीडित मुलगी लोणी काळभोर परिसरातील शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी तरुणाने पिडीतेवर प्रेम असून तिला लग्नाचे आमिष दाखविले. आरोपीच्या लग्न करण्याच्या दिलेल्या आमिषाला पीडिता बळी पडली.
आरोपीने त्याच्या दुकानात पिडीतेसोबत ऑक्टोबर 2022 साली शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणाने पिडीतेला लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील लॉजवर नेऊन वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले.
यातून विद्यार्थिनी गर्भवती राहिली. हे समजल्यानंतर आरोपीने पीडितेच्या आईसमोर वेगळ्या जातीचे असल्याचे कारण सांगून लग्न करण्यास नकार दिला.
त्याने पिडीतेच्या गर्भातील 10 आठवडे 15 दिवस वयाचे बाळाचा एका खासगी रुग्णालयात गर्भपात करून घेतला आहे. याप्रकरणी पीडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परिमंडळ 5 च्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.





