आरोग्य सामग्रीवरील जीएसटी रद्द करा- राहुल गांधी
Updated On:

नवी दिल्ली : देशात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करोना विषाणूंपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर या गरजेच्या वस्तू लोक खरेदी करत आहे. मात्र या गोष्टींवर जीएसटी कर आकारला जात आहे. कोरोनाच्या लढाईदरम्यान आरोग्यासाठी लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी कर रद्द करावा, अशी मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
करोना महामारी दरम्यान आरोग्यासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी या जीएसटीमुक्त कराव्यात. आरोग्य आणि आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या जनतेला सॅनीटायझर, साबण, मास्क, हॅंड ग्लोव्ज यासारख्या गोष्टींवर जीएसटी लादणं चुकीचं आहे. त्यामुळे या सर्वांवरील जीएसटी कर तात्काळ रद्द करावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे केली आहे.





