सातारा । मुसळधार पावसात महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याची डागडुजी

लिंब – राष्ट्रीय महामार्गावर नागेवाडी ते आनेवाडी टोलनाका सर्व्हिस रस्त्यावर पडलेले मोठे खङ्ङे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने भर कोसळणार्या पावसात मुजविल्याने सर्वाना आश्चर्य वाटत आहे.
नागेवाडी ते आनेवाडी टोलनाक्यापर्यंतचा सर्व्हिस रस्ता खूप खराब झाला आहे. वास्तविक पावसाळ्यापूर्वी या रस्त्यामधील पडलेले खड्डे मुजविणे आवश्यक होते. परंतु लालफिती कारभारामुळे भर पावसाळात या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांना मुहूर्त सापडला आहे. भर पावसात मुजविण्यात आलेले खड्डे हे पुन्हा पावसाने वाहून जाणार असून पुन्हा त्याच मार्गवर खड्डे पडणार आहेत.
सर्व्हिस रस्त्यावरील पडलेल्या खङ्ङयाबाबत पावसाळ्यापूर्वी नियोजन करणे गरजेचे होते. सर्व्हिस रस्त्याचा वापर असंख्य दुचाकी वाहन चालक करीत असतात सुरक्षित प्रवासासाठी सर्व्हिस रोडचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या मार्गावर सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
महामार्गावरील खड्ड्यांचे काय ?
सर्व्हिस रस्त्यावरील पडलेले खड्डे मोजविण्यासाठी भर पावसात तत्परता दाखविणार्या राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने मात्र हायवेवरील पडलेल्या रस्त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. सर्व्हिस रोड वरून वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गावरील रस्ते हे उत्तम असणे आवश्यक आहे. दरवर्षी पडणाऱ्या पावसामुळे हे रस्ते खराब होतात. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचा सर्व्हे करून त्याची डागडुजी वेळेत व्हायला हवी.





