Netrakosh Book: प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते यांच्या ‘नेत्रकोष’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
Netrakosh Book: वाचक आणि रुग्णांसाठी हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध असून, लवकरच सर्व प्रमुख बुक स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच, 'डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर' (माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे) येथेही हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Netrakosh Book: पुण्यातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते लिखित ‘नेत्रकोष’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे उत्साहात संपन्न झाले. डोळ्यांच्या विविध आजारांची शास्त्रोक्त माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत मांडणाऱ्या या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत आनंद व्यक्त केला.
या पुस्तकाला ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि ‘दीक्षित डाएट प्लॅन’चे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे.
पुस्तकाची वैशिष्ट्ये:
सर्वसामान्यांसाठी उपयुक्त: डोळ्यांचे आजार, त्यांची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन.
घरगुती व वैद्यकीय उपाय: घरच्या घरी करता येणारे उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा, याची स्पष्ट माहिती.
अनुभवाचे बोल: डॉ. दुधभाते यांच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवाचा अर्क या पुस्तकात उतरला आहे.
रुग्णांचे अभिप्राय: विविध आजारांतून मुक्त झालेल्या रुग्णांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आले आहेत.
उपस्थित मान्यवर:
या सोहळ्याला आमदार अभिमन्यू पवार, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, लेखक डॉ. अनिल दुधभाते, सौ. डिंपल दुधभाते, साहित्यिक गिरीश वसेकर, डॉ. स्नेहल मानपुत्र, तन्मय कारंजकर, कृष्णा सरवदे यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
वाचक आणि रुग्णांसाठी हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध असून, लवकरच सर्व प्रमुख बुक स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच, ‘डॉ. दुधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर’ (माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे) येथेही हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आले आहे.





