Devendra Fadnavis: “सर्व समाजाच्या अधिकारांचे संरक्षण करू” – मुख्यमंत्री
Devendra Fadnavis:

एका समाजाचा अधिकार काढून दुसऱ्याला देणार नाही
Devendra Fadnavis: सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच निर्णय घेत असून, मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसह सर्व समाजांच्या अधिकारांचे संरक्षण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. एका समाजाचा अधिकार काढून दुसऱ्या समाजाला दिला जाणार नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
पुणे येथे एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, की एखाद्या मंत्र्याकडे तक्रार आल्यानंतर ती संबंधित विभागाकडे चौकशीसाठी पाठविणे, ही घटनात्मक प्रक्रिया आहे. यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आणि वास्तव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले. ते म्हणाले, की मान्सून संपल्यानंतर चाकणमधील संपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हाती घेतले जाईल. स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करून रस्ते, देखभाल- दुरुस्ती करणे शक्य होईल.
पवारांवरील टीका ही संकुचित मानसिकता Devendra Fadnavis:
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर होत असलेल्या टीकेवरही फडणवीस यांनी भाष्य केले. महिलांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे ही संकुचित मानसिकता असल्याचे त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचे काम आणि त्यांचा आत्मविश्वास हेच त्यांच्या टीकाकारांना उत्तर देण्यासाठी पुरेसे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.





