Raghav Chadha : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट्स हटवा.! राघव चढ्ढा बदनामी प्रकरणी दिल्ली हायकोर्टाचे आदेश
खासदार राघव चढ्ढा यांना लक्ष्य करणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश देत दिल्ली उच्च न्यायालयाने राघव चढ्ढा यांना दिलासा दिला.

Raghav Chadha – खासदार राघव चढ्ढा यांना लक्ष्य करणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश देत दिल्ली उच्च न्यायालयाने राघव चढ्ढा यांना दिलासा दिला.
मात्र, त्याच वेळी न्यायालयाने यावरही भर दिला की, सार्वजनिक जीवनातील व्यक्तीने अतिसंवेदनशील असू नये आणि आपल्या निर्णयांवरील कोणत्याही टीकेबद्दल तक्रार करू नये.
राघव चढ्ढा यांची बदनामी करणाऱ्या पाच सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रथमदर्शी या पोस्ट बदनामीकारक असल्याचे आढळून आल्याने त्या हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात व्यक्तिमत्व हक्कांचे उल्लंघन झाले नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती सुब्रमणियम प्रसाद यांनी निरीक्षण नोंदवले की, यात व्यक्तिमत्त्व हक्कांचा प्रश्न नाही, मी पाच पोस्ट हटवण्याचे आदेश दिले आहेत. बाकीच्या पोस्ट प्रथमदर्शनी बदनामीकारक नाहीत.
उपहासात्मक विनोदाच्या स्वरूपात केलेली टीका आपोआपच आक्षेपार्ह किंवा बदनामीकारक ठरत नाही. तसेच सार्वजनिक जीवनातील व्यक्तीने आपल्या निर्णयांवरील कोणत्याही टीकेबद्दल तक्रार करण्याइतके अतिसंवेदनशील असू नये आणि अशा टीकेकडे नम्रतेने पाहिले पाहिजे.





