“महाराज आजही रायगडावर आहेत हे लक्षात ठेवा…”; प्रविण तरडेंनी व्यक्त केला संताप; पर्यटकांना हात जोडून केली विनंती

Pravin Tarde | अभिनेते प्रविण तरडे यांनी सोशल मिडियावर रायगडवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी रायगडची झालेली दुरावस्था तेथील कचरा पाहून पर्यटकांना हात जोडून विनंती केली आहे. अनेकदा गड-किल्ल्यावर काही समाजकंटकांकडून धुमाकूळ घातला जातो.
तसेच, गड-किल्यांवर फिरायला जाणाऱ्यांकडून तिथे कचरा केला जातो किंवा ऐतिहासिक वास्तूंची विटंबणा केली जाते. यावर शिवप्रेमींनी अनेकदा आवाज उठला आहे. मात्र आता प्रविण तरडे यांनी रायगडाला भेट देता तेथील झालेली अवस्था पाहून मन सुन्न झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. विश्वास पाटील देखील होते. Pravin Tarde |
प्रविण तरडे यांना रायगडमधील पुरातन वास्तूंच्या दगडी भिंतींमध्ये प्लास्टिक कचरा कोंबुन ठेवलेला दिसला. त्यामुळे प्रविण तरडे यांनी रायगडवर येऊन कचरा करणाऱ्या पर्यटकांना हात जोडून विनंती केली आहे. या पोस्टला प्रविण तरडे यांनी एक कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मित्रांनो रायगड आपली राजधानी आहे. आपल्यासाठी तीर्थक्षेत्रच आहे. त्याचं पावित्र्य जपा. महाराज आजही रायगडावर आहेत हे लक्षात ठेवा.” Pravin Tarde |
View this post on Instagram
भिंतीच्या भेगांमध्ये ठेवलेला कचरा पाहून ते म्हणाले की, “ही कचरा टाकण्याची जागा नाही. राजांचा आहे हा किल्ला. रायगड आपला आहे. इथल्या भींती, दगडांना हात लावताना कधी तरी इथून महाराज गेले असतील. याला स्पर्श केला असेल. महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो आणि आपल्या लोकांनी काय केलंय ते बघायचंय का तुम्हाला?? या ऐतिहासिक वस्तूंच्या खपच्यांमध्ये हे बघा (प्लास्टिकचे रॅपर्स).” Pravin Tarde |
पर्यटकांना रायगड स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
“ज्याने कोणी हे इथं टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो की, परत रायगडावर येऊ नकोस. येथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला आहे, आपलं रक्त सांडलं आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथे आहेत. त्याचं भान ठेवा. ” व्हिडीओच्या शेवटी प्रवीण तरडे यांनी पर्यटकांना रायगड स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. “दगडांच्या भेगांमध्ये कचरा टाकू नका. ही आपली राजधानी आहे. त्यामुळे आपणच काळजी घ्यायला हवी,” असे प्रवीण तरडे म्हणाले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. Pravin Tarde |
हेही वाचा:





