धक्कादायक! रायगडमध्ये 90 रुग्णांना रेमडेसिविरमुळे जाणवला त्रास; तात्काळ थांबवला वापर

मुंबई, दि. 30- अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्‍शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रायगड जिल्ह्यासाठी हेटेरो हेल्थ केअर कंपनीच्या कोविफोर या इंजेक्‍शनच्या 500 कुप्या पुरवण्यात आल्या होत्या.

त्यानंतर साधारण 120 करोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्‍शन वापरण्यात आले होते. यापैकी 90 रुग्णांना या इंजेक्‍शनमुळे दुष्परिणाम जाणवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सगळ्यांमध्ये इंजेक्‍शन दिल्यानंतर थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसून आली.

इतक्‍या मोठ्या प्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्याने आता अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिविर इंजेक्‍शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचे एका माध्यमाच्या बातमीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.