लक्षवेधी : शस्त्रास्त्रे झाली उदंड

– नरेंद्र क्षीरसागर
विनाशकारी शस्त्रांची अधिकाधिक उपलब्धता होत असल्याने मानवी हिंसक प्रवृत्ती भयंकर रूप धारण करत आहेत. शस्त्रांवरचे वाढते खर्च पाहता अनेक देशांची पायाभूत सुविधा पूर्ण करण्याची क्षमताही संकुचित होते.
लहानमोठे विविध प्रकारच्या संहारक शस्त्रांचा वाढता प्रसार हा जगातील शस्त्रनिर्मिती उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हा एक मोठा धनलाभ मिळवून देणारा उद्योग असून त्यात भ्रष्टाचार किंवा अन्य मार्गातून राजकारणावर प्रभाव पाडण्याची प्रचंड क्षमता आहे.‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने विविध उद्योगांची रॅकिंग आखताना लाचखोरीचा निकष ठेवला आणि लाचखोरीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या उद्योगात आहे, यावर जागतिक उद्योगाची क्रमवारी ठरविण्यात आली. यात शस्त्रास्त्रे उद्योगाला दुसरे स्थान मिळाले. अमेरिकी वाणिज्य विभागाच्या जनरल अकाउंटिग ऑङ्गिसच्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या एकूण व्यापारापैकी 50 टक्के लाच देण्याचे प्रमाण शस्त्रांशी संबंधित व्यापारात दिसून येते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार या क्षेत्रात जेवढ्या किमतीचा व्यवहार होतो, त्याच्या किमान दहा टक्के लाच दिली जाते. हे दहा टक्के अब्जावधी डॉलरमध्ये असतात.
शस्त्रांच्या विक्रीशी संबंंधित भ्रष्टाचाराची मोठी रक्कम ही छुप्या मार्गाने परकी खात्यात जमा केली जाते; परंतु त्याचा भांडाङ्गोड होण्याच्या भीतीने आता त्यात बदल होत आहेत आणि नवनवीन युक्त्या शोधल्या जात आहेत. एकप्रकारे भ्रष्टाचाराला वाचा ङ्गुटणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. रणगाडे, मोठ्या तोङ्गा, लढाऊ विमाने, जहाज, पाणबुड्या आदींच्या व्यवहारात खूपच सधन आणि धनाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या सामील आहेत आणि त्यांचे थेट हात ‘वर’पर्यंत पोचलेले असतात. या कंपन्या सत्ताधार्यांवर प्रभाव टाकतात आणि अब्जावधी डॉलरचे करार करण्यास भाग पाडतात.
मग या कारणामुळे जगातील वर्तमान आणि भविष्यकाळ संकटात का पडेना, त्यांचे याच्याशी काही देणेघेणे नसते. या कंपन्या आणि त्याच्या दलालांमुळे नि:शस्त्रीकरणाचे प्रयत्न पुढे सरकू शकले नाहीत. सध्या या गोष्टींची जगाला नितांत गरज आहे. जगातील बहुतांश जनता शांतता आणि सौहार्दतेने राहण्याची इच्छा बाळगून आहे; परंतु शस्त्र करारातील आर्थिक हेतू, स्पर्धा तसेच मिलीभगत ठेवणारे नेते हे असे वातावरण तयार करतात की तेथे महागडे शस्त्रे असणे गरजेचे वाटू लागते.
परिणामी संहारक शस्त्रांना नियंत्रित करणारा आंतरराष्ट्रीय करार पुढे जाण्याऐवजी तो मागे पडत असून त्याचा प्रभाव हा दिवसेंदिवस कमी होत आहे. दुसरीकडे प्रत्येक प्रकारच्या लहानमोठ्या आणि हलक्या शस्त्रांतील संहारक क्षमता वाढविली जात असून त्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘हिंसा आणि आरोग्य’ यावरचा अहवाल पाहता गोळ्यांची मारक क्षमता, वेग आणि पल्ला यात प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्याचबरोबर या शस्त्रांची संहारकतादेखील वाढली आहे.
एके-47 मध्ये तीन सेकंदात किमान तीस ङ्गैरी झाडण्याची क्षमता आहे आणि प्रत्येक गोळी ही एक किलोमीटरपेक्षा अधिक लांब पल्ल्यांपर्यंत लक्ष्य वेधू शकते. ‘अॅन्मेस्टी’ इंटरनॅशनल आणि ‘ऑक्सफेम’च्या अहवालात म्हटले, कोणत्याही शस्त्रांच्या तुलनेत लहान शस्त्रांचा वापर हा अधिकाधिक लोकांचा जीव घेणे, जखमी करणे, स्थलांतरित करण्यास भाग पाडणे, शोषण करणे, अपहरण करणे, अत्याचार करणे यासाठी केला जातो.
सध्या जगात सुमारे 64 कोटी शस्त्रे आहेत. विशेष म्हणजे जगातील सुमारे 60 टक्के लहान शस्त्रे ही सैन्य आणि पोलीस दलाच्या कार्यक्षेत्राबाहेर आहेत. केवळ लष्कराच्या वापरासाठी एका वर्षात चौदा अब्ज गोळ्यांचे उत्पादन केले जाते. म्हणजे जगातील एकूण लोकसंख्येच्या दुप्पट. एकीकडे मानवी वृत्ती हिंंसक होत असताना त्याचवेळी हानिकारक शस्त्रांची मुबलक उपलब्धता चिंताजनक आहे. धोकादायक शस्त्रांना मागणी वाढत आहे, त्याच्या अधिकाधिक वापरामुळे संभाव्य विनाशाची भीतीही वाढत आहे.
सध्या जगात शस्त्रस्पर्धा वाढत असून अब्जावधी डॉलरमध्ये शस्त्रांचे करार होतात, तर त्याचवेळी संबंधित देशातील लोकसंख्येचा मोठा भाग स्वच्छ पाण्यापासून वंचित राहतो किंवा कुपोषणाने पीडित आहे. जगभरातील विविध पातळीवर नि:शस्त्रीकरणाचे अभियान वेगाने राबविण्याची गरज आहे. या मोहिमेच्या बळावर शस्त्र, स्ङ्गोटक साहित्यांची मागणी, उत्पादन, उपलब्धता आणि वास्तविक वापर याच्या प्रत्येक स्तरावर काम करता येईल. जागतिक पातळीवर धोकादायक शस्त्रांविरोधात अनेक मोहिमा राबविल्या आणि आजही सक्रिय आहेत. अशा प्रयत्नांतून जागतिक पातळीवर काही धोकादायक शस्त्रांवर बंदी घालणारे काही करारही झाले. भूसुरूंग स्ङ्गोटकं तर खूपच धोकादायक आहे. या कारणांमुळे निष्पाप लोकांचा नाहक बळी जातो. एकतर ते गंभीर जखमी होतात आणि अनेकदा तर आयुष्यभर अपंगत्वाचा सामना करावा लागतो.
युद्ध संपल्यानंतरही बराच काळापर्यंत युद्धाच्या काळात पेरून ठेवलेले आयईडीसारख्या स्ङ्गोटकांच्या भागात लहान मुले आणि नागरिकांचा वावर राहतो. ते एकप्रकारे ज्वालामुखीवर राहात असतात. भूसुरुंगांवर बंदी घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार झाले. बहुतांश देशांनी त्यास मान्यता दिली; परंतु काही महत्त्वाच्या देशांची मान्यता मिळणे अजून बाकी आहे. अनेक दहशतवादी संघटना भूसुरुंगाचा वापर करत दहशत निर्माण करत असतात. आता तर क्लस्टर बॉम्बसारखे अति धोकादायक स्ङ्गोटक उपलब्ध झाले आहे. त्यात एक मोठ्या बॉम्बने लहानसहान बॉम्ब ङ्गेकले जातात आणि त्याचे स्ङ्गोट होतात.
त्यातील काही बॉम्ब तत्काळ ङ्गुटतात तर काही काही तासांनंतर ङ्गुटतात. ते नागरिकांना गंभीर जखमी करतात किंवा जीवावरही बेततात. प्रामुख्याने अशा स्ङ्गोटकांच्या तडाख्यात सापडलेल्या लहान मुलांना बराच काळ वेदनादायी त्रास सहन करावा लागतो. क्लस्टर बॉम्बविरुद्ध देखील मोठी मोहीम राबविण्यात आली. परिणामी त्यावर बंदी घालणारा आंतरराष्ट्रीय करार देखील झाला. हे एक मोठे यश आहे आणि त्यावर अजून काही देशांच्या स्वाक्षर्या राहिल्या आहेत. ‘ब्लाइंडिग लेसर’ हे अंधत्व आणणार्या लेसरवर बंदी आणणारा एक आंतरराष्ट्रीय करार देखील झाला आहे.
आता एक मोठे आव्हान म्हणजे रोबोटिक्सचा लष्करात होणारा वापर. रोबोचा लष्करात वापर केल्यास अनेक धोके आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकारचे शस्त्र हे मानवी नियंत्रणाच्या बाहेरचे असू शकते आणि ते अधिक विध्वंसक असू शकते. रोबो आल्याने युद्धाची तीव्रता ही गंभीर पातळीवर पोचू शकते आणि त्यालाही स्वयंचलित मशीनने नियंत्रित केले जाऊ शकते. एका अर्थाने युद्धाशी संबंधित विनाश आणि अनिश्चितता ही कमालीची वाढत आहे. स्टिङ्गन हॉकिन्ससारख्या शास्त्रज्ञांनी रोबोटिक्सचा लष्करातील वापराविरुद्ध मत मांडून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर जीवघेण्या रोबोला रोखण्यासाठी अभियान सक्रिय आहे. या प्रकारच्या अभियानात जनता सहभागी होत असेल तर धोकादायक शस्त्र वापरण्याची शक्यता कमी असू शकते आणि त्याला रोखता येऊ शकते. नव्याने निर्माण होणार्या तणावामुळे जगात अनेक स्तरावर युद्धजन्य स्थिती निर्माण होत आहे. आता सर्वात मोठे आणि कठीण आव्हान तर अण्वस्त्रांचा प्रसार आणि संभाव्य वापर करण्यापासून रोखण्याचे आहे.





