सुधाकर बडगुजर यांना दिलासा; तडीपार नोटीसप्रकरणी 10 दिवसांची मुदतवाढ

नाशिक – उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक शहर पोलिसांनी तडीपारीची नोटीस दिली होती. याबाबत त्यांना म्हणणे मांडण्यासाठी शनिवारी (दि.१९) १० दिवसांची मुदतवाढ दिली.
१० मे रोजी नोटीसप्रकरणी आठ दिवसांची म्हणणे मांडण्यासाठी मुदत दिली होती. त्यानुसार बडगुजर शनिवारी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या कार्यालयात हजर झाले होते.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यानुसार बडगुजर यांच्यावर व्हीपी अॅक्ट ५७ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना तडीपार नोटीस दिली आहे.
यासंदर्भात बडगुजर हे शनिवारी (दि.१८) कार्यालयात हजर राहिले. त्यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले असून, त्यांनी कागदपत्रे सादर केली आहेत.
या नोटीसीत ज्या गुन्ह्यांचा उल्लेख आहेत ते २०१०-२०१४ कालावधीतील आहेत. हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे असून, या गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता झाली आहे. २०१४ चा एक खटला न्यायप्रविष्ठ असून, उच्च न्यायालयात अपील केले आहे.
काही महिन्यांपूर्वी सलीम कुत्तासोबत डान्स केलेल्या प्रकरणात बेकायदेशीर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यानुसार पोलिसांनी बडगुजरांनी १० दिवसांची मुदत दिली आहे.





